• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे

by gauravsalunkhe00@gmail.com January 9, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
32

भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा

महिला भगिनींनो “देवाभाऊं”च्या विजयासाठी निवडणूक हाती घ्या- पंकजा मुंडे

पिंपरी चिंचवड 9 जानेवारी (प्रतिनिधी): भाजपची मुख्य भूमिका म्हणजे स्त्रीचा सन्मान आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. म्हणूनच भाजपने महिला भगिनींचा सन्मान करणारे स्त्री शक्तीयुग आणले. म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या विकासाची ही निवडणूक हाती घ्यायची आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. विरोधक चुकीचे सांगतील मात्र या भूलथापांना बळी पडायचे नाही. भाजपचा विकासाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आपण भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचे आहे असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ विमल गार्डन, रहाटणी येथे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे उपस्थित होत्या. दरम्यान प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार नीता पाडाळे, कोमल काळे, अॅड हर्षद नढे आणि विनोद नढे. प्रभाग 23 मधील उमेदवार मनीषा पवार ,तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे, प्रभाग 24 मधील उमेदवार करिष्मा बारणे, सिद्धेश्वर बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर. प्रभाग क्रमांक 27 मधील उमेदवार बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, सविता खुळे, चंद्रकांत नखाते. प्रभाग 28 शत्रुघ्न काटे, अनिता काटे, संदेश काटे, कुंदा भिसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा पार पडली.

पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, गेल्या 20 ते 25 वर्षापासून सातत्याने पिंपरी चिंचवड शहरात येत असते. या शहराने कायम विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विकासाची भूमिका ठामपणे मांडल्यामुळे गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे. उज्वला योजना, गरीब कल्याण योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांमधून तळागाळातल्या वंचितांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना अंमलात आणली नसती तर आज आमच्या लाखो लाडक्या बहिणींचे पैसे थेटपणे त्यांच्या खात्यात जमा झाले नसते. याच माध्यमातून आलेली किसान योजना, बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमधून आपण वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे प्रत्येक घटकाची सुधारणा हे सूत्र आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक विचाराचे सरकार असल्यानंतर देशांमध्ये अमुलाग्र सुधारणा कशी होऊ शकते हे आपण गेल्या दहा वर्षांमध्ये पाहिले आहे. भाजपच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे एक युग आपण आणले आहे. स्त्रीचा सन्मान करणारी भाजपची भूमिका आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. त्यामुळे जी पाळण्याची दोरी सांभाळते ती जगाला सुद्धा उद्धारू शकते. ही भूमिका भाजपने सर्वदूर पोहोचवली . महिलाशक्ती मध्ये खूप मोठे दायित्व आहे. म्हणूनच भाजपच्या माध्यमातून आणलेली ”लाडकी बहीण योजना” समाजाच्या सर्व घटकांवर दूरगामी परिणाम करणारी ठरली असेही मुंडे म्हणाल्या.
भाजपने कधीच जातीवादी धर्मवादी भूमिका स्वीकारली नाही असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या गरिबांचे अश्रू पुसताना कोणताही रंग, कपडे याचे प्रमाण मानले नाही. कोणतीही योजना रंग पाहून राबविली नाही. तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण आहे. गरीबीच्या रंगातून बाहेर पडून संपन्नतेचा रंग आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला आहे.

मुंडेसाहेब, लक्ष्मणभाऊंच्या विचारांचा वारसा जपा; पंकजा मुंडे यांचे आवाहन
जननेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. त्यांची कन्या म्हणून माझी ओळख आहे. मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात मुंडे साहेबांचे नाव कोरलेले आहे. त्याच मुंडे साहेबांच्या समाजभिमुख कार्याला स्मरून भाजपला या भागातील रहिवासी मतदान करतील असा मला विश्वास आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या भागात विकासाचा झंजावात निर्माण केला त्यांच्या स्मृतींना स्मरून या निवडणुकीत एक विचाराने भाजपला निवडून आणायचे आहे.

भाजपच्या पाठीशी ढाल म्हणून महिला शक्ति उभी – पंकजा मुंडे

”गरिबांचे कल्याण आणि महिलांचा सन्मान” या धोरणातून भाजप काम करत आहे. मोठमोठ्या देवांना देखील दानवांचा संहार करणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी देवीचे आवाहन केले. हे स्त्रीशक्तीचे सामर्थ्य आहे. सतयुग, त्रेतायुग त्यानंतर द्वापरयुग आणि मग कलियुग आपण जाणतो . मात्र भाजपने स्त्रीशक्तीचे युग आणले आहे. पालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकांमध्ये हीच स्त्रीशक्ती भाजपच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहणार आहे असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये भाजपाची भव्य जाहीर सभा”
next post
पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला मत द्या – ॲड. नितीन लांडगे

You may also like

“कर्तव्यपथाचे ३६५ दिवस” : आमदार अमित गोरखे यांच्या...

December 14, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : मतदान...

December 20, 2025

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय...

January 11, 2026

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले यांची मोठी...

February 22, 2025

‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध

January 12, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश...

April 11, 2026

पीसीयू येथे क्रीडारंभ २०२६ महोत्सवाचा जल्लोष

March 23, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३...

April 24, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक:...

March 5, 2025

पिंपरी चिंचवड निवडणूक 2025 : प्रभाग...

December 29, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here