• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून झाडाझडती
पिंपरी चिंचवडपुणे

सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून झाडाझडती

by gauravsalunkhe00@gmail.com February 5, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
45

रुग्णाच्या मृत्यूबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार – आमदार जगताप

डॉक्टरांची कमी संख्या, सोलर सिस्टिम, एमआरआय सेंटर बंद

अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, घाणीचे साम्राज्यामुळे आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटर वर ; आमदार जगताप यांचा संताप

पिंपरी, 4 फेब्रुवारी : सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेवरुन बुधवारी आमदार शंकर जगताप यांनी रुग्णालय प्रशासनाची चांगली झाडाझडती घेतली. “आरोग्य व्यवस्थेची अक्षरशः हेळसांड मांडली आहे”. अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. डॉक्टरांची कमी संख्या, सोलर सिस्टिम कार्यान्वित नसणे, एमआरआय सेंटर बंद असल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत बुधवारी आमदार शंकर जगताप यांनी अचानक पाहणी दौरा दरम्यान आमदार जगताप म्हणाले, हे रुग्णालय पुणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या केंद्रस्थानी आहे. अनेक प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मोफत दरात उपलब्ध असल्यामुळे उपचारांसाठी जिल्ह्यातून या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी असते. मात्र अनेक दिवसांपासून या रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबतच्या तक्रारी केल्या जात होत्या. या संदर्भात वारंवार नागरिकांची निवेदने येत होती. त्या अनुषंगाने आज अचानक रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नागरिकांनी केलेल्या तक्रारी पेक्षाही विदारक अवस्था दिसून आली. ठिकठिकाणी अस्वच्छता, मोडकळीस आलेली आसन व्यवस्था, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयाच्या आवारात सांडलेले सांडपाणी अशा अनेक तक्रारी निदर्शनास आल्या मुख्य म्हणजे डॉक्टरांच्या उपस्थितीची संख्या देखील नियमाप्रमाणे नव्हती असे आमदार जगताप यांनी सांगितले

यावेळी अति दक्षता विभाग, एक्स-रे सेंटर, एम आर आय सेंटर या ठिकाणी पाहणी केली असता एम आर आय सेंटर बंद असल्याचे दिसून आले तर आयसीयू कक्षा साठी प्रचंड वेटिंग देखील दिसून आली. बऱ्याचदा रुग्णांना सिविल हॉस्पिटल मधून ससून रुग्णालयात रेफर केले जाते अशा तक्रारी देखील नागरिकांनी केल्या डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयातून अनेक पेशंट इतरत्र पाठवले जातात असे देखील यावेळी निदर्शनास आले.

रुग्णालयातील “शवागार” बंद ; आरोग्यवस्था गॅसवर

या रुग्णालयातील “शवागार” बंद आहे. याशिवाय सोलर सिस्टिम बसवण्यात आलेली आहे. मात्र त्याचे नेट मीटरिंग केलेले नसल्यामुळे अजूनही या प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला नाही. एकीकडे सांगवी जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांची वाताहत आहे. याही पलीकडे येथील आरोग्य सेवक असलेले डॉक्टर, नर्स, विविध कर्मचारी या सर्वांनीच आरोग्य व्यवस्था गॅसवर ठेवण्याचे काम केले असल्याचे आमदार म्हणाले. अति दक्षता विभागात देखील कोणतेही सुरक्षेचे नियम पाळले जात नव्हते. बाहेरून आलेले कर्मचारी, पेशंटचे रुग्ण, अगदी डॉक्टर सुद्धा चप्पल बूट घालून फिरत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

अधिवेशनात लक्ष वेधणार

या रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जपणामुळे १८ जानेवारी २०२६ रोजी सुमित सोनवणे या ३० वर्षे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सुमितला त्रास होत असतानाही त्याला नॉर्मल असल्याचे सांगितले गेले. प्राथमिक जुजबी उपचार करून घरी पाठवण्यात आले. यानंतर घरी सदर रुग्णाला प्रचंड त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला . या दुर्दैवी घटनेबद्दल राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे असे देखील यावेळी जगताप यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी चिंचवड तसेच लगतच्या अनेक ग्रामीण भागातून सांगवी जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या या रुग्णालयामध्ये रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे अपेक्षित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोग्य सेवेला बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे . त्या माध्यमातून अनेक योजना, जिल्हा रुग्णालय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रुग्णालयांना बळकट करण्याचे काम विविध स्तरातून सुरू आहे. कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये हा भाजपाचा प्राधान्यक्रम आहे. सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत अनेक अडचणी, तक्रारी माझ्यापर्यंत आल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आज अचानक रुग्णालयाची पाहणी केली. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टर,कर्मचारी सर्वांना सूचना केल्या आहेत. दरम्यान या रुग्णालयातील एका रुग्णाच्या मृत्यूच्या घटनेबाबत मुंबई अधिवेशनात राज्य शासनाचे लक्ष वेधणार आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध!
next post
वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड. सचिन पानी

You may also like

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य...

March 4, 2026

हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार 2025 : बालप्रतिभांचा...

November 8, 2025

८ मजली इमारतीला लागली आग, काही सेकंदात धावले...

April 17, 2025

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री...

February 6, 2026

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२...

March 4, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

आरोग्याशी खेळ नको! नगरसेवक यश साने यांची पाणीपुरवठा...

February 14, 2026

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब...

February 9, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार...

June 5, 2026

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय...

July 2, 2025

तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू...

March 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here