• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून नव्याने आखणी होणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by gauravsalunkhe00@gmail.com January 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
18

कोल्हापूरच्या धर्तीवर “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार पूररेषेसाठी नवा युडीसीपीआर ; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना मोठा दिलासा

आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा मुद्दा:   मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

निळ्या आणि लाल पूररेषेचा प्रश्न कायमचा निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पिंपरी चिंचवड 9 जानेवारी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रमध्ये  फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डी येथील सभेत शनिवारी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी (दि १०) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे उमा खापरे ,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निळी आणि लाल पूररेषेचा प्रश्न युनिफाईड डीसीपीआरमुळे निर्माण झाला. यातील काही तरतुदींमुळे तांत्रिक अडचण आली आहे. नदी लगतच्या अनेक भागांमध्ये नवीन डेव्हलपमेंट थांबलेली आहे. निळी आणि लाल पुररेषा हा 100  वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्या वेळच्या पूररेषेच्या मार्किंगनुसार ही रेषा ठरली होती . या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कोल्हापूरमध्ये निळ्या आणि लाल पूररेषे संदर्भात नव्याने डीसीपीआर करण्यात आला. या आराखड्यानुसार एखाद्या परिस्थितीमध्ये पूर संभाव्य स्थिती उद्भवली तर कशा पद्धतीचे बांधकाम असले पाहिजे. याबाबत नवीन  नियम केले आणि हे नियम लोकांनी स्वीकारले . त्या पद्धतीने बांधकामे केली.
पिंपरी चिंचवडमध्ये ज्या भागात निळी आणि लाल पुररेषा संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी सॅटॅलाइट इमेजचा वापर करून, जीआयओ स्पेशल डेटाचा वापर केला जाणार आहे. “फ्लड मिटीगेशन सिस्टिम”चा वापर केला जात आहे. पुढच्या काळात युनिफाईड डीसीपीआरमध्ये देखील बदल केला जाईल. आणि पिंपरी चिंचवड शहरातील निळी व लाल पुर रेषेसंदर्भातला प्रश्न कायमचा निकालात काढण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.

नदी संवर्धन, प्रॉपर्टी कार्डचा मुद्दा प्राधान्याने सोडवणार

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पवना मुळा आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी आपण 2300 कोटीचा प्रकल्प तयार केला आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षात रखडलेला शहराचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडवल्याचे सांगितले तसेच लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मागणीप्रमाणे शास्तीकारदेखील पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केला. प्राधिकरण बाधित जमिनींचा फ्री होल्ड चा प्रश्न भाजपाच्या माध्यमातून सोडविल्याचे सांगितले. अग मी काळात प्रॉपर्टी कार्ड चा मुद्दा देखील प्राधान्याने सोडवणार असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात मेट्रोचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात केले जाईल तिसरी मेट्रो या शहराला देण्यात येणार आहे. विकास आराखड्यातील रस्ते आपण मोठे करत आहोत. एलिवेटेड कॅरीडोर, उड्डाणपूल,  अंडर पास या माध्यमातून वाहतूक सुलभ केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना उत्तर

भाजपने केलेल्या कामांची गुणवत्ता गेल्या 25 वर्षातील कामांच्या तुलनेत सरस आहे. 15 वर्ष जेएनएनयुआरएम अंतर्गत स्वस्तातील घरांचे बांधकाम रखडले होते.  13 हजार घरांपैकी केवळ 6 हजार 700 घरे विरोधकांना पूर्ण करता आली. मात्र 2017 पासून भाजपच्या सत्ता काळात पिंपरी, बोऱ्हाडेवाडी, चर्होली ,  डुडुळगाव या भागांमध्ये 20 हजार घरांची निर्मिती भाजपच्या माध्यमातून झाली. या घरांची गुणवत्ता विरोधकांनी एकदा पाहून घ्यावी.

जीसीसी हबमुळे पिंपरी चिंचवड विकासाच्या केंद्रस्थानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यापूर्वी पुणे जिल्हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉजीचे हब होता. मात्र आगामी काळात पुणे जिल्हा हा जीसीसी हब म्हणून ओळखला जाणार आहे. भारतातील 25% जीसीसी इन्व्हेस्टमेंट एकट्या पुणे जिल्ह्यात होणार असून, त्यामध्ये पिंपरी चिंचवड केंद्रस्थानी असेल.  पुढच्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दुपटीने वाढणार आहे. त्याच दृष्टिकोनातून या भागात आपल्याला नियोजन करावे लागणार आहे.म्हणूनच एक विचाराचे सरकार आपल्याला आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभेत निळी आणि लाल पूररेषा, प्रॉपर्टी कार्ड, रेड झोन संदर्भात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. वारंवार या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिवेशन, मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून आपण प्रश्न मांडत आहोत.  आज या सभेच्या माध्यमातून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे.समस्त पिंपरी चिंचवडकर यासाठी त्यांचे आभारी राहतील.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय (आठवले) युतीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा
next post
भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाचा शक्तिप्रदर्शनाचा एल्गार

You may also like

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

March 10, 2026

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे...

January 8, 2026

“निगडी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे धरणे आंदोलन...

March 20, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा, २२ फेब्रुवारीला...

February 17, 2025

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

“भोसरीत रस्त्यांचा विकास वेगात! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 22, 2025

Latest News Updates बालवाडी शिक्षणात नवा अध्याय: हस्तपुस्तिका,...

March 12, 2025

“सामाजिक एकतेचा अनोखा उत्सव: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त...

December 14, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

🔴 जनसंवाद दौऱ्यातून विश्वासाचा सेतू; विजयनगर-काळेवाडीत...

December 24, 2025

“वास्तुरचनाकारांसाठी सुवर्णसंधी! विकास आचलकर यांचे अनमोल...

February 22, 2025

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे...

February 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here