• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड

by gauravsalunkhe00@gmail.com February 6, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
61

सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे तर विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची करण्यात आली नियुक्ती

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण; २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब

पिंपरी, दि. ६ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या विहीत वेळेत वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिठासीन अधिकारी दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची विशेष सभा आज पार पडली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरूवातीस सभेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

महापौर व उपमहापौर पदाचा स्विकारला पदभार

महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप यांनी शहरवासीयांच्या वतीने त्यांचा सन्मान केला. तर महापालिका प्रशासनाच्या वतीने पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसदस्य, नगरसदस्या यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण

यावेळी सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना मांडली. या सूचनेला नगरसदस्य राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केली.

अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रांगणात असलेल्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांस देखील त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे
next post
स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर तो मिळवून देणे माझी जबाबदारी – महापौर रवि लांडगे

You may also like

Latest News Updates बालवाडी शिक्षणात नवा अध्याय: हस्तपुस्तिका,...

March 12, 2025

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड...

February 21, 2026

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये गाडगेबाबा जयंतीचा जल्लोष! प्रमुख पाहुणे म्हणून विशालभाई...

February 24, 2025

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये भव्य सोहळा...

February 25, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव

December 22, 2025

संतांच्या नावे महामंडळ स्थापन करून सरकार जातींमध्ये फूट...

October 17, 2025

पीसीसीओईआरचा ‘एसएई इंडिया ई-बाहा २०२६’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम...

January 20, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू...

January 3, 2026

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा...

October 25, 2025

वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा...

March 2, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here