• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत

by gauravsalunkhe00@gmail.com January 16, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

भाजपाचा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित- आमदार महेश लांडगे यांची भावूक प्रतिक्रिया 

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज जाहीर होत असलेल्या निकालांकडे पाहता, पिंपरी-चिंचवडकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर ठाम विश्वास व्यक्त केला असून, भाजपचा एकहाती महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांन आम्ही साद घातली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

https://phoenixmetronews.in/wp-content/uploads/2026/01/VID-20260116-WA0398.mp4

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 च्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले होते. मागील काही दिवसांपासून शहरात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू होती. आज निकालावरुन पिंपरी-चिंचवडची जाणती व स्वाभिमानी जनता भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 85 जागांवर विजय मिळाला आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 36, शिवसेना शिंदे गटाला 6 आणि अपक्ष 1 असे संख्याबळ आहे. भाजपा आणि शिंदे गट युती झाल्यास भाजपा महायुतीने 91 जागांवर विजय मिळवल्याचे स्पष्ट होते.

यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे.

तसेच, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमा खापरे, विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांचे मानले आभार…
तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान आहे. घराघरात जाऊन केलेला संवाद, लोकांशी निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच आज हे यश शक्य झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णतः कटिबद्ध असून, नागरिकांनी दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल. महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांचा वेग वाढवून पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनवण्याचा संकल्प भाजप निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे. आगामी काळात शहराच्या शाश्वत विकासासाठी मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पित भावनेतून काम करण्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
संभाजीनगरात सिद्धिविनायक मंदिरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन
next post
भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला – आमदार शंकर जगताप

You may also like

“युवोत्सव २०२५”च्या रंगतदार उद्घाटनाने पिंपरी चिंचवड दणाणले!

February 28, 2025

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात वाईट: वाहतुकीचे...

March 31, 2025

राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भैरवी सरोदे ने पटकावले...

December 14, 2024

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई!

December 17, 2024

“नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जावेद अख्तर यांना !...

April 21, 2025

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार –...

June 3, 2025

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे...

February 20, 2026

“मोशीतील कत्तलखाना आरक्षण रद्द! वारकरी भावनांचा विजय, संतभूमीत...

June 21, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद!...

June 30, 2025

शुक्रवारी चिंचवड येथे संविधान सुरक्षा परिषद

December 12, 2024

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच...

March 15, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here