• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे अभिमानास्पद – ज्ञानेश्वर लांडगे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे अभिमानास्पद – ज्ञानेश्वर लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com February 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
68

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पीसीसीओईआर ला पुरस्कार जाहीर

पिंपरी, पुणे (दि. १० फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही केजी टू पीएचडी शिक्षण देणारी देशातील एक अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे. पीसीईटीमध्ये आकुर्डी, रावेत आणि साते, वडगाव मावळ अशा तीन भव्य कॅम्पसचा समावेश आहे. यामध्ये शिशुवर्ग पासून डॉक्टरेट होण्यापर्यंत उच्च शिक्षण देणाऱ्या एकूण दहा संस्थांचा समावेश आहे. यामध्ये २०१४ साली रावेत येथे स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय (व्यावसायिक कोर्स) पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले.

पीसीसीओईआर ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (व्यावसायिक कोर्स) २०२५-२६” जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी तसे पत्र महाविद्यालयाला दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. रुपये १,५०,०००/-, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पीसीसीओईआर चे संचालक, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाचे कर्मवीर ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये २०२५-२६ या वर्षासाठी “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी भाग” साठी पीसीसीओइआर ची निवड झाली आहे. यापूर्वी पीसीसीओइआर ला दोन वेळा ‘एनबीए’ (नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिशन) मानांकन तसेच आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत एआयसीटीइ, नवी दिल्ली आणि डीटीइ, मुंबई यांच्या द्वारे मान्यता मिळाली आहे. नॅक (३.५४) द्वारे ‘ए++’ दर्जा मिळाला आहे. पीसीसीओईआर मध्ये ४४ पीएचडी धारक आणि ५५ पीएचडी करणारे प्राध्यापक आहेत. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, संशोधन आणि नवीन उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण असलेल्या पीसीसीओईआरने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या पाच महाविद्यालयात स्थान प्राप्त केले आहे.

या महाविद्यालयाने आतापर्यंत ४१९ पेटंट दाखल केले आहेत. ज्यामध्ये २८५ प्रकाशित, ५० मंजूर आणि ३ पेटंट यशस्वीरित्या व्यावसायिकृत सुरू झाले आहेत. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी, एकाच दिवसात सर्वाधिक कॉपीराईट अर्ज दाखल करून या महाविद्यालयाने ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ चे प्रमाणपत्र मिळवले आहे. तसेच १७ डिसेंबर २०१९ रोजी, एकाच दिवशी पेटंट दाखल करणाऱ्या पीसीसीओईआरच्या ३८ महिला प्राध्यापकांना देखील ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ ने मान्यता प्रमाणपत्र दिले आहे. उत्पादन विकास, नवीन उपक्रम, प्रकाशन, पेटंट आणि कॉपीराइट फायलिंग, इंक्युबेशन आणि उद्योजकता यावर आधारित प्रकल्प सादर करून उच्चशिक्षित संशोधक घडवणे यावर महाविद्यालय काम करीत असते. यासाठी नेहमीच विश्वस्त मंडळाचा पाठिंबा मिळत असतो.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआर च्या सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्गाचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर
next post
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन

You may also like

“३१ मार्च आज शेवटची संधी! थकबाकीदारांची मालमत्ता कोणत्याही...

March 31, 2025

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

पिंपरीत युवासेनेचे शुभम मुळे यांचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश;...

January 10, 2026

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!

January 30, 2026

शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप...

August 28, 2026

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : मतदान...

December 20, 2025

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस” – रस्त्यावर...

March 8, 2025

गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये...

January 9, 2026

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मुंबईच्या जंगलात आता 54 बिबटे –...

May 4, 2025

वाकड–मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला वेग...

October 8, 2025

“फक्त ५०० रुपये? लाडकी बहिणींच्या पदरात...

April 15, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here