• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ साठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जोरदार तयारी सुरू
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ साठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जोरदार तयारी सुरू

by gauravsalunkhe00@gmail.com January 29, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
17

शहर स्वच्छतेसाठी सफाई सेवकांचे अविरत श्रमदान…

पिंपरी, दि. २९ जानेवारी २०२६ : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ स्पर्धेत राज्यात सर्वप्रथम आणि देशात सातवा क्रमांक प्राप्त केलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी देशात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने शेकडो सफाई सेवक अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने शहराचे रूप पालटण्याचे काम सध्या अविरतपणणे करीत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना धूळमुक्त, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड हे उद्योगनगरी आणि गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे प्रमुख रस्ते दिवसभर वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे दिवसा स्वच्छता करणे मोठे आव्हान ठरते. ही अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रात्रपाळी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे.

या मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्वीपिंग मशीनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते. वॉटर स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवत असल्याने स्वच्छतेच्या कामाला गती मिळत आहे.

सर्व कर्मचारी आवश्यक सुरक्षासाहित्य परिधान करून रात्रभर कार्यरत असतात. शहर झोपेत असताना हे ‘स्वच्छता योद्धे’ शहराला नव्या पहाटेची तयारी करून देतात. महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
—

ओला व सुका कचरा वेगळा द्या

– कचरा विलगीकरण करून घरगुती कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घंटागाडीला द्यावा.

– रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग टाळावे, जेणेकरून साफसफाईत अडथळे येणार नाहीत.

– सार्वजनिक ठिकाणे व आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या अहोरात्र स्वच्छता मोहिमेमुळे दिवसभर वाहतुकीने गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांची प्रभावी साफसफाई शक्य होत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि सफाई सेवकांचे समर्पित योगदान यामुळे शहराची स्वच्छता पातळी सातत्याने उंचावत आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ मध्ये उल्लेखनीय स्थान मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. सफाई सेवकांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करणे व सार्वजनिक स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी समजून सक्रिय सहभाग नोंदवावा.

*— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका*
…

You Might Also Like
  • गरजू नागरिकांसाठी ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू
  • PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’ शिक्षण प्रणालीवर शिक्षकांना मार्गदर्शन
  • श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!
  • पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी
  • श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा
  • ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी – जुआन बेनावेंटे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
next post
अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!

You may also like

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष मेळावा: लाखो...

March 4, 2025

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल...

April 3, 2025

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय...

August 18, 2025

“डिजिटल मीडियाच्या वेगवान युगात बातम्या सेकंदात जगभर पोहोचतात...

March 3, 2025

“महिला दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी मातेला दिला अभूतपूर्व...

March 8, 2025

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व...

January 7, 2026

सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू ६ वरून...

February 27, 2026

“अभिनेत्री आर्या घारेचा शिवजयंतीचा अनोखा संकल्प – नाचून...

February 20, 2025

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित पवारांचा थेट...

December 27, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 758 views
  • 3

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 748 views
  • 4

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 717 views
  • 5

    “”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती, ज्ञान आणि...

    March 26, 2025 713 views

Categories

  • आरोग्य (37)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (14)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (490)
  • पुणे (282)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (214)
  • मावळ (2)
  • राजकारण (148)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (37)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (14)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (490)
  • पुणे (282)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (214)
  • मावळ (2)
  • राजकारण (148)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर...

February 23, 2025

“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक...

February 21, 2025

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली...

December 11, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here