• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जागृती अभियानाचा प्रारंभ
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जागृती अभियानाचा प्रारंभ

by gauravsalunkhe00@gmail.com December 16, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
98

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

देव–देश–धर्म आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधणाऱ्या ‘विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान’ या अभिनव उपक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरात प्रारंभ होत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकार होणारे हे अभियान भोसरी विधानसभा मतदारसंघात दि. 16 ते 25 डिसेंबरदरम्यान राबवले जाणार आहे. सलग दहा दिवस चालणाऱ्या या उपक्रमात भोसरीतील 12 प्रभागांमध्ये घराघरांत जाऊन जनजागृती केली जाणार आहे.

या अभियानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ गौरव रथ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, बलिदान आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करून देणारा हा गौरव रथ विविध प्रभागांतून प्रवास करणार आहे. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि विकास यांचा संदेश देणारा हा रथ नागरिकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. देशात प्रथमच विकास आणि हिंदुत्व यांची सांगड घालणारे विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेले जगातील सर्वात उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प — ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ — पिंपरी-चिंचवडची नवी ओळख ठरत आहे. हे स्मारक केवळ ऐतिहासिक वारसा नसून शिव–शंभू विचारांचे प्रेरणास्थान आणि भावी पिढ्यांसाठी शक्तीस्थळ ठरणार आहे.

या अभियानामागील वैचारिक भूमिका स्पष्ट करताना, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. श्रद्धा, संस्कृती आणि आधुनिक विकास यांचा समन्वय साधल्यासच विकसित राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संघटनात्मक बळावर थेट जनसंवाद

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्ना प्रमुखांपासून प्रभाग अध्यक्षांपर्यंतच्या संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन अभियानाची सुरुवात होईल. त्यानंतर पालक–विद्यार्थी संवाद, शाळांमधील सुविधांची पाहणी, तज्ज्ञ डॉक्टर, सीए आणि उच्चशिक्षित नागरिकांशी ‘चाय पे चर्चा’, महिला बचतगट संवाद, दुपारी गौरव रथ यात्रा, रॅली, महाआरती आणि सांगता सभा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

विकासात्मक हिंदुत्वाची व्यापक संकल्पना

विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान केवळ धार्मिक ओळख मर्यादित न ठेवता पर्यावरण, शिक्षण, क्रीडा, जैवविविधता, ग्रामसंस्कृती आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधते. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी उपक्रम, गावठाण संवर्धन, आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा संकुले, बायोडायव्हर्सिटी पार्क, शिक्षणसंस्था, संविधान भवन, गोसंवर्धन आणि नियोजित नागरी विकास हे या विचारांचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले.

आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया

“हिंदुत्व ही केवळ ओळख नसून ती संस्कृती, मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. विकासाशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे आणि हिंदुत्वाशिवाय विकास दिशाहीन ठरतो. पिंपरी-चिंचवडला विकास आणि संस्कृती यांचा समतोल साधणारे आदर्श शहर बनवण्यासाठी विकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियान जनआंदोलन म्हणून राबवले जाईल,” असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
जनजागृती अभियानधर्मवीर संभाजी महाराजनगरसेवक निवडणूकपिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवड बातम्याभाजपाभारतीय जनता पार्टीभोसरी विधानसभामहापालिका निवडणूकमहाराष्ट्र राजकारणमहेश लांडगेविकासविकासाभिमुख हिंदुत्वविकासाभिमुख हिंदुत्व जागृती अभियानशिव-शंभू विचारशिवाजी महाराजस्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणस्थानिक राजकारणहिंदुत्वहिंदू संस्कृती
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प निर्णायक टप्प्यात
next post
आचारसंहिता कालावधीत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा रद्द

You may also like

विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे...

March 5, 2026

उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प निर्णायक...

December 14, 2025

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ, संदीप वाघेरे यांचा अजित...

December 22, 2025

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

“कष्टकरींचा आवाज हरपला, पण आठवणी जिवंत आहेत! गोपीनाथ...

June 3, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

“पिंपरी-चिंचवड ITI चा कायापालट ? ITI ला मिळणार...

March 16, 2025

युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक...

April 1, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचा...

January 11, 2026

“महिला दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी मातेला दिला अभूतपूर्व...

March 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे...

January 19, 2026

सेवा विकास बँक बचाव कृती समिती...

December 7, 2025

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे ‘न्यू होम...

October 31, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here