• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर तो मिळवून देणे माझी जबाबदारी – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क, तर तो मिळवून देणे माझी जबाबदारी – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com February 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
69

महापौर रवि लांडगे यांनी केली निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी

पिंपरी, दि. ७ फेब्रुवारी २०२६ – पिंपरी चिंचवड शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने महापौर रवि लांडगे यांनी आज निगडी व चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहराला लागणारी एकूण पाण्याची गरज, महापालिकेच्या वतीने सध्या करण्यात येणारा पाणीपुरवठा, तसेच भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता राबविण्यात येत असलेल्या व प्रस्तावित उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, चीफ केमिस्ट डॉ. प्रशांत जगताप, कार्यकारी अभियंता विजयसिंग भोसले, महेश बरीदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिखली परिसरासाठी सध्या इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून दररोज ९० एमएलडी पाणी घेण्यात येते. हे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून परिसरातील नागरिकांना वितरित करण्यात येते. याशिवाय भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्यासाठी २०० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. तसेच निगोजे येथील सध्याची पंपिंग व्यवस्था ही आंद्रा धरणातून थेट जलवाहिनी कार्यान्वित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

यानंतर निगडी येथील सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे त्यांनी केंद्राबाबत सविस्तर आढावा घेतला. हे जलशुद्धीकरण केंद्र सुरुवातीला ११४ एमएलडी क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र शहराचा विस्तार, नवीन निवासी व औद्योगिक क्षेत्रांची वाढ आणि पाण्याच्या मागणीत झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता या केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला आहे. सध्या हे केंद्र ५५० एमएलडी क्षमतेने कार्यरत असून पवना नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून तसेच पंपिंग व्यवस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सुमारे ७५ टक्के क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, गुणवत्ता तपासणीचे निकष आणि वितरण व्यवस्थेची माहितीही यावेळी महापौर यांना देण्यात आली.

या पाहणीदरम्यान भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, पाणी उचल, शुद्धीकरण व वितरणाची साखळी, पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी प्रक्रिया तसेच शहरातील विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांची क्षमता व स्थिती याबाबत मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे व सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी माहिती दिली.

यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांना भविष्यातही नियमित, पुरेशा दाबाने आणि दर्जेदार पाणीपुरवठा होण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आणि त्यासाठी अधिकाधिक दर्जेदार उपाययोजना राबविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड
next post
पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील – विठ्ठल काळभोर

You may also like

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी...

October 27, 2025

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १०० दिवसांच्या कृती...

February 28, 2025

“पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ९० हून...

May 29, 2025

“पिंपरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस च्या...

April 14, 2025

पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला...

January 9, 2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड...

February 12, 2026

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी...

August 20, 2025

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

February 5, 2025

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा भूमिपूजन सोहळा...

February 24, 2025

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा...

March 3, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी...

January 26, 2026

निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून...

January 11, 2026

आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण...

April 6, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here