• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र!
पिंपरी चिंचवडराजकारण

मोशीत साकारणार वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकास केंद्र!

by gauravsalunkhe00@gmail.com August 18, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
29

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
– राज्य मंत्रिमंडळाची जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील मौजे मोशी (ता. हवेली) येथील १५ हेक्टर शासकीय जमीन क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय (चिंचवड गाव) आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळेला देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या जागेवर मागास व वंचित आदिवासी समाजासाठी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक विकासाचे सर्वांगीण केंद्र साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्रांतिवीर चापेकर समितीचे पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांनी या जागेची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. विधानसभा अधिवेशनादरम्यान आमदार महेश लांडगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक बळ दिले. त्यानंतर शासनस्तरावर प्रक्रिया गतिमान झाली आणि अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ हेक्टर शासकीय जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.

आमदार महेश लांडगे यांनी ‘क्रांतिवीर चापेकर समिती जागा मागणी’ हा विषय सातत्याने शासनदरबारी लावून धरला होता. नुकतेच त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक घेण्याची विनंती केली होती. यामध्ये या जागेच्या मागणीचाही समावेश होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळणार आहे.

मंजूर करण्यात आलेल्या या जागेवर क्रांतिवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळेच्या माध्यमातून मागास व वंचित आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विकास केंद्र साकारले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, कौशल्यविकास आणि सामाजिक प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. सामाजिक समरसता, शिक्षण आणि वंचित घटकांच्या विकासाला चालना देणारे हे केंद्र पिंपरी-चिंचवड परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांनी केलेली मागणी आणि त्यामागील व्यापक सामाजिक उद्देश लक्षात घेऊन हा विषय शासनदरबारी सातत्याने मांडला. विधानसभा अधिवेशनादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मागणीला सकारात्मक बळ दिले. अखेर मंत्रिमंडळाने १५ हेक्टर शासकीय जमीन देण्यास मंजुरी दिल्याने हा प्रश्न मार्गी लागला, याचा मनस्वी आनंद आहे. या केंद्रामुळे वंचित आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण, संस्कार आणि विकासाच्या नव्या संधी मिळतील. पिंपरी-चिंचवड शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी माझा पाठपुरावा यापुढेही असाच सुरू राहील.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
  • २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया
next post
आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश महामोर्चा

You may also like

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी...

July 26, 2026

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा...

January 6, 2026

घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी...

August 1, 2026

📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने...

April 19, 2026

“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव राव सहस्त्रबुद्धे...

October 16, 2025

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार अमित गोरखे...

April 8, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची...

February 19, 2026

पिंपरी–चिंचवडला झेप घेण्यासाठीचा “संकल्पनामा”! – आमदार शंकर जगताप

January 13, 2026

“अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी भाजप महिला मोर्चाची प्रेरणादायी सलामी” –...

May 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“ऑफिस पॉलिटिक्सचा खेळ संपला! या १०...

March 25, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त...

February 12, 2026

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय...

July 2, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here