• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा आमदार अमित गोरखे घेणार मोठा निर्णय
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा आमदार अमित गोरखे घेणार मोठा निर्णय

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
47

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही राज्य सरकार गप्प का? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी आमदार अमित गोरखे यांचा आक्रमक पवित्रा

मुंबई | दिनांक : २० फेब्रुवारी २०२६

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाअंतर्गत उपवर्गीकरण करण्यासंदर्भात निकाल दिला. या निकालानंतर राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि जमातींमधील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ देता येणार आहे. तेलंगणा उप-वर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र अजून यासंदर्भात कोणतीही पावले उचलली गेली नाही. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ५९ पोटजातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळवून देण्यासाठी ‘अ-ब-क-ड’ (ABCD) नुसार उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. राज्य सरकारने येणाऱ्या काळात यावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन आमदार अमित गोरखे यांनी ‘अ ब क ड’ आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने आणि आंदोलनात्मक पावले उचलली आहेत. प्रामुख्याने २०२३ आणि २०२४ काळात हा लढा आणखी तीव्र झाला.

२० मे २०२५ रोजी मातंग समाजाच्या वतीने मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी देखील पुढाकार घेतला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मातंग समाजाच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. डिसेंबर २०२५ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आपल्या शर्टवर ‘अ.ब.क.ड.’ असे अक्षरे प्रिंट करून त्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. अनुसूचित जातींमधील ५९ उपजातींपैकी अनेक घटक आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या वंचित घटकांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा मुद्दा त्यांनी पावसाळी आणि हिवाळी दोन्ही अधिवेशनांत लावून धरला आहे.

प्रमुख मागण्या आणि भूमिका:
SC उपवर्गीकरण अंमलबजावणी: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, महाराष्ट्रातील ५९ उपजातींपैकी, ज्यांना अद्याप आरक्षणाचा योग्य लाभ मिळालेला नाही, अशा अत्यंत मागास उपजातींना प्राधान्य मिळण्यासाठी अ-ब-क-ड वर्गीकरण लागू करावे.
न्यायालयीन आदेशाचे पालन: हे वर्गीकरण केवळ राजकीय मागणी नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी.

समितीच्या अहवालाला गती: या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या कामात होणारा विलंब टाळून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून उपेक्षित समाज मुख्य प्रवाहात येईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला

आमदार गोरखे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणात ‘उप-वर्गीकरण’ (Sub-classification) करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे.

मग राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब का लावत आहे? मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मादिगा समाजासह ५९ जाती या आदेशाची वाट पाहत आहेत.

वंचितांना न्याय देण्याचा निर्धार

आरक्षण हा केवळ धोरणात्मक विषय नसून तो वंचित समाजाच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्यासाठी आहे. जर आरक्षण मिळूनही ५९ पोटजातींमधील माझे बांधव शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहत असतील, तर त्यांच्या हक्कासाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.

असंतोष वाढल्यास सरकार जबाबदार आमदार गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वी अनेकदा हा विषय मांडला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘या विषयाचे गांभीर्य ओळखून, लवकरात लवकर अ-ब-क-ड आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करू’, असे ठोस आश्वासन दिले होते.

परंतु, याप्रकरणी अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने समाजात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सरकारला पुन्हा एकदा रीतसर निवेदन पाठवणार आहोत.

मात्र, त्यानंतरही सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर मी केवळ एक आमदार म्हणून नाही, तर वंचित समाजाचा प्रतिनिधी म्हणून मोठा निर्णय घेणार, असा स्पष्ट इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
२३ फेब्रुवारीला शहरातील पाणीपुरवठा बंद; निगडी जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरुस्ती
next post
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे वर्चस्व कायम

You may also like

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना...

August 26, 2026

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या : आमदार...

March 12, 2026

आमदार शंकर जगताप यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची...

July 9, 2025

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली – खा....

August 22, 2026

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

“”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती, ज्ञान आणि...

March 26, 2025

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ‘विद्यार्थी...

February 14, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

सेवा विकास बँक बचाव कृती समिती...

December 7, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस...

February 8, 2026

युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त...

April 1, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here