• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडराजकारण

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
39

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात विकासकामांचा सखोल आढावा; नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश

पिंपरी, दि. १७ मार्च २०२६ :
प्रत्येक प्रभागातील नगरसदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांशी सातत्याने समन्वय राखत स्थानिक अडचणींची अचूक नोंद घेऊन त्या तत्परतेने व परिणामकारक पद्धतीने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या.

नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर वेळेत कार्यवाही करणे गरजेचे असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट केल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल, असेही महापौर रवि लांडगे यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथे नागरी सुविधांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण, स्थापत्य, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, भटके कुत्रे, उद्यानांची देखभाल तसेच इतर मूलभूत नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. सुरू असलेल्या विकासकामांना गती देताना गुणवत्तेची तडजोड होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला. तसेच अनावश्यक विलंब टाळून निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रभागनिहाय सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेत आगामी कामांचे नियोजन अधिक परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, निधीचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे आणि नागरिकांच्या गरजांनुसार कामांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी सर्व विभागांनी अधिक सजग, जबाबदारीने व उत्तरदायित्वाने कार्य करणे गरजेचे असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले. तसेच प्रभागस्तरावर नियमित आढावा बैठका घेऊन समस्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नीता पाडाळे, कोमल काळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, तसेच नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर, विनोद नढे, संतोष कोकणे, धर्मपाल तंतरपाळे, निलेश तरस, शेखर चिंचवडे उपस्थित होते.

तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान नगरसदस्यांनी त्यांच्या प्रभागातील विविध समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत मुद्देसूद मांडणी केली.

“नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या या केवळ तक्रारी नसून त्या प्रशासनासाठी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या बाबी आहेत. प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहून वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कार्यवाही करणे हीच खरी नागरिकसेवा आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील सुसंवाद जितका मजबूत होईल, तितक्याच वेगाने शहराचा विकास साधता येईल,”
महापौर रवि लांडगे

You Might Also Like
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नवोन्मेष व उद्योजकता विषयक परिसंवादाचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये आयोजन
next post
‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची सुवर्णसंधी

You may also like

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई...

April 28, 2025

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत...

February 9, 2026

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

June 18, 2025

“कुणाल कामराच्या टीकेने शिवसेना आक्रमक! मुंबईत हॉटेलमध्ये तोडफोड,...

March 24, 2025

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी श्रीमती...

March 20, 2026

‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम...

February 7, 2026

हंट फॉर द सीक्रेट सुपरस्टार 2025 : बालप्रतिभांचा...

November 8, 2025

“शिंदेसाहेबांसारखा नेता महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला – शंभूराज देसाई...

May 9, 2025

गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये...

January 9, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 821 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत...

March 16, 2026

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात...

March 31, 2025

यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता...

September 21, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here