• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

by gauravsalunkhe00@gmail.com March 2, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
68

दिग्गज कलाकारांची उद्घाटनाला असणार उपस्थिती

जास्तीत जास्त चित्रपट प्रेमींनी या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा लाभ घेण्याचे महापौर रवि लांडगे यांचे आवाहन

पिंपरी, दि. २ मार्च २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६ चे आयोजन ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव सकाळी १० वाजलेपासून सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त चित्रपट प्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ चे उद्घाटन मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार असून पारितोषिक वितरण व समारोप समारंभ गुरूवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी संस्थापक दत्ता गुंड, सचिव अभिषेक अवचार, महोत्सव सचिव विश्वास शेंबेकर, पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व्यवस्थापकीय संचालक जय भोसले, गाथा फिल्म सोसायटी अध्यक्ष पुजा गुंड, उत्सव समिती प्रमुख श्रुती शेंबेकर यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके, मराठी अभिनेते क्षितीश दाते यांचीही या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती असणार आहे, अशी माहिती क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा विचार करून चित्रपटांची निवड करण्यात आली असून प्रत्येक कलाकृतीतून समाजमनाला स्पर्श करणारे तसेच विचारप्रवर्तक विषय प्रभावीपणे मांडले गेले आहेत.

या महोत्सवात तब्बल ४३ देशांमधील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांद्वारे विज्ञान विरुद्ध अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञानातील बदल, प्रेम व मानवी भावना, महापूर आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनप्रेरणादायी कार्यावर आधारित विविध विषयांचा वेध घेण्यात आला आहे. यासोबतच शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृतीचे जतन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदलाबाबत जनजागृती तसेच कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा विविध समाजाभिमुख आणि सकारात्मक विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

चित्रपट क्षेत्रात महिला दिग्दर्शकांना अधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महोत्सवामध्ये ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महिला दिग्दर्शकांच्या सर्जनशील कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम विशेष ठरणार असून ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ शहराच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालण्यासोबतच नव्या विचारांना प्रेरणा देणारा उपक्रम ठरेल.

‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ अंतर्गत बुधवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी महोत्सवातील विविध स्पर्धा विभागांतील उत्कृष्ट चित्रपटांना गौरविण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवादरम्यान प्रदर्शित झालेल्या लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट या विविध गटांतील निवडक चित्रपटांना सन्मानित करण्यात येणार असून ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ या विशेष पुरस्काराचाही प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास चित्रपटसृष्टीतील मान्यवर, परीक्षक तसेच सहभागी दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी संस्थापक दत्ता गुंड यांनी दिली आहे.

याशिवाय, ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ अंतर्गत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन दि. ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषा, शिक्षण आणि सांस्कृतिक ओळख यांमधील परस्परसंबंध उलगडून दाखवणारा हा चित्रपट चित्रपटप्रेमींना मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने चिंतनाची संधी उपलब्ध करून देईल.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर भर देणार : अभिषेक बारणे
next post
वर्षातील प्रत्येक सण हा पर्यावरणपूरक साजरा करा— महापौर रवि लांडगे

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र...

April 3, 2025

पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी

March 14, 2026

पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६...

February 21, 2026

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी...

December 21, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

April 12, 2026

आषाढीवारीची जय्यत तयारी! पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वारकऱ्यांचे स्वागत...

May 27, 2025

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी...

July 26, 2026

वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड....

February 5, 2026

प्रभाग ११ मध्ये भाजप पॅनलचा आक्रमक प्रचार; निलेश...

January 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025

नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती –...

August 28, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’; ८ आणि...

March 4, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here