• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!
पिंपरी चिंचवड

भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!

by gauravsalunkhe00@gmail.com October 30, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
7

भाजपा आमदार महेश लांडगे यांची महापारेषणला सूचना

– भोसरी- दिघी रस्त्यावर टॉवर क्र. १७ मुळे वाहतुकीस अडथळा, अपघाताचा धोका

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

भोसरी-दिघी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेला २२० के.व्ही. अतिउच्च दाब विद्युत वाहिनीचा मनोरा (टॉवर क्र. १७) वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने तो तातडीने स्थलांतरित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

भोसरी-दिघी हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले असून, बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेला महापारेषणचा अतिउच्च दाब विद्युत मनोरा अद्याप स्थलांतरित केलेला नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात येत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा आमदार लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि अवजड वाहनांसाठी हा मनोरा धोकादायक ठरू शकतो. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होत आले असतानाही मध्यभागी असलेल्या मनोऱ्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि संभाव्य अपघाताचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनोरा स्थलांतराचा विषय प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आमदार लांडगे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या मनोऱ्याच्या स्थलांतरासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने महापारेषण प्रशासनाशी यापूर्वी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. प्रशासकीय पत्रव्यवहार आणि विभागीय समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणे योग्य नसल्याचे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महापारेषण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी. टॉवर क्र. १७ च्या स्थलांतरासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, खर्चाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक तरतुदीची प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी. तसेच, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

भोसरी-दिघी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी विद्युत मनोऱ्याचे स्थलांतर विनाविलंब पूर्ण करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या प्रश्नावर अधिक विलंब होऊ नये, यासाठी महापारेषण प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे.

भोसरी-दिघी रस्त्याचे काँक्रिटीकरण बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेला अतिउच्च दाब विद्युत मनोरा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नावर प्रशासकीय दिरंगाई स्वीकारार्ह नाही. महापारेषण आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त समन्वयातून तांत्रिक व आर्थिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. टॉवर क्र. १७ स्थलांतरासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी अपेक्षा आहे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न

You may also like

हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड ते मामुर्डी...

November 8, 2025

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात वाईट: वाहतुकीचे...

March 31, 2025

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये गाडगेबाबा जयंतीचा जल्लोष! प्रमुख पाहुणे म्हणून विशालभाई...

February 24, 2025

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ‘विद्यार्थी...

February 14, 2026

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे ‘न्यू होम मिनिस्टर खेळ...

October 31, 2025

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार...

October 15, 2026

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

मानव कांबळे यांची अंनिस पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड –...

March 20, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 822 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (564)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (564)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा...

March 10, 2026

महात्मा फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक...

April 12, 2026

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व...

April 15, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here