• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडआरोग्यराजकारण

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
304

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचा घेतला आढावा

पिंपरी, दि. १० मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासोबतच त्यांचे संगोपन, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण यासाठी ठोस उपाययोजना करा. पिंपरी चिंचवड शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्या वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अर्चना सस्ते, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, मंदार देशपांडे, उत्तम केंदळे, संजय काटे, सुहास कांबळे, उपायुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महापौर रवि लांडगे यांनी शहरात श्वान संगोपन केंद्र उभारण्याबाबत विशेष भर देत, यासाठी प्रभागनिहाय उपलब्ध जागांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या केंद्रांच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे संगोपन, लसीकरण, उपचार तसेच नसबंदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे त्यांनी नमूद केले. यासाठी संबंधित नगरसदस्यांच्या सहकार्याने प्रभागनिहाय योग्य जागा निश्चित करून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच शहरातील भटक्या व पाळीव श्वानांची अचूक संख्या, त्यांचे वितरण तसेच नसबंदी आणि लसीकरणाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले. शहरातील नागरिकांकडून येणाऱ्या श्वानांबाबतच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निवारण करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने समन्वयाने काम करण्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे आरोग्य संवर्धन करणे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे, असे निर्देशही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपायुक्त संदीप खोत यांनी पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शहरात प्राणी जन्मनियंत्रण (ABC) अंतर्गत नसबंदी मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत असून, या वाहनांद्वारे श्वान पकडणे, नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडणे ही प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करणे आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यासाठीही ही वाहने वापरण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले असून, प्राण्यांशी संवेदनशील पद्धतीने वागण्याबाबत विशेष मार्गदर्शनही देण्यात आले आहे. श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी शहरातील काही संभाव्य जागांची प्राथमिक पाहणी देखील करण्यात आली असून, त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे उपायुक्त खोत यांनी सांगितले.
…..

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे
next post
‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

You may also like

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका!”

January 3, 2026

Phoenix Metro News “अरिजित सिंहच्या कॉन्सर्टने पुणेकर मोहित!...

March 17, 2025

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल...

February 27, 2026

“घोटाळ्यांना Full Stop… आता विकासाला Fast Track!” –...

June 14, 2025

पिंपरी गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला...

January 5, 2026

“पिंपरी चिंचवडच्या महिला बचत गटांचा राष्ट्रीय स्तरावर झेप...

February 21, 2025

‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक...

March 7, 2025

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर पाण्याची टाकी...

March 8, 2025

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर,...

December 7, 2025

पिंपरीत युवासेनेचे शुभम मुळे यांचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश;...

January 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार...

April 8, 2026

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! महापालिकेचे नवे...

April 22, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या...

April 3, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here