• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत शो – इतिहासाचा रोमांचक अनुभव!
पिंपरी चिंचवडमनोरंजनसमाजकारण

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत शो – इतिहासाचा रोमांचक अनुभव!

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
490

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रम

नवी सांगवी :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरातील अंध, दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशील जीवनाचे दर्शन घडवण्यात आले.

आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन चित्रपटगृहात बुधवार, दि. १९ रोजी हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. शिवरायांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांच्या पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनदेखील संघर्ष आणि बलिदानाने भरलेले आहे. त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शिवरायांचे सुपुत्र नव्हते, तर ते एक अद्वितीय योद्धा, विद्वान आणि स्वराज्यरक्षक होते. त्यांचे जीवन धैर्य, निष्ठा आणि त्यागाचे उत्तम उदाहरण आहे. कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास आणि धैर्याने संकटांवर मात करता येते, याचे उत्तम उदाहरण संभाजी महाराजांनी घालून दिले आहे,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रपटाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्ही प्रथमच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला. हा अनुभव आम्हाला अविस्मरणीय वाटतो. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्यामुळे ही संधी मिळाली. त्यांच्या आणि आयोजकांच्या मनःपूर्वक आभारी आहोत,” असे त्यांनी सांगितले. चित्रपट समाप्त होताच सर्व विद्यार्थ्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणा देत चित्रपटगृह दणाणून सोडले.

विशेष सहभाग

या विशेष उपक्रमात पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्र, दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रम, रावेत येथील झुंज दिव्यांग संस्था आणि मामुर्डी येथील माई बाल भवन येथील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यासोबतच संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षकवृंदांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यात पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे, दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमाचे केंद्र प्रमुख सुरवसे साहेब, रावेत येथील झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे, मामुर्डी येथील माई बाल भवनचे प्रमुख मधुकर इंगळे आदींचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय मराठे आणि माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांनी विशेष परिश्रम घेतले. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी लाभली.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“अभिनेत्री आर्या घारेचा शिवजयंतीचा अनोखा संकल्प – नाचून नव्हे, शिवचरित्र वाचून साजरी केली जयंती!”
next post
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने 22 फेब्रुवारीला नवनिर्वाचित आमदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

You may also like

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि...

March 16, 2025

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या...

July 12, 2025

शर्वरीचा ग्लॅमरस अवतार! दुर्मीळ अल्बर्टा फेर्रेत्ती गाऊनमध्ये मोहक...

February 28, 2025

प्रभाग १० (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद; वर्षा...

December 31, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर जगताप यांच्या...

December 20, 2025

रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न

December 3, 2024

आज सकाळपासून GPay, PhonePe बंद! वापरकर्ते सोशल मीडियावर...

April 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’...

February 28, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या...

March 4, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here