• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर भर देणार : अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवडराजकारण

शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर भर देणार : अभिषेक बारणे

by gauravsalunkhe00@gmail.com March 2, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
62

अभिषेक बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाचा स्वीकारला कारभार

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अभिषेक बारणे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. महापालिका भवनातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात हा पदभार स्वीकारण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित सभापती अभिषेक बारणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, अशा परिस्थितीत स्थायी समितीची जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या विकासावर प्रतिक्रिया देताना अभिषेक बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे देशातील एक प्रगत शहर म्हणून ओळखले जाते. या शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर माझा भर राहील. प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घेतले जातील. सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा हा शहराच्या हितासाठी आणि दर्जेदार कामांसाठीच खर्च होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घेतली जाईल.

आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागांतील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून अभिषेक बारणे यांच्याकडे पाहिले जाते, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात प्रामुख्याने पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासकीय कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, आगामी काळात शहरातील सुरु असलेले आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक; शासनाचे ‘लक्ष’ वेधले!
next post
महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

You may also like

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड...

February 12, 2026

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

January 17, 2026

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला...

February 15, 2026

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक पातळीवर उमेदवारांचे...

January 8, 2026

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

March 20, 2026

गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये...

January 9, 2026

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे...

March 10, 2026

कोकणातील उष्णतेच्या लाटेने वाढविली चिंता, पुण्यातही वाढेल तापमान!

March 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“कचऱ्यापासून सुंदरतेची निर्मिती: भोसरीतील गुडविल चौकाची...

March 5, 2025

“पाणीटंचाईने त्रस्त पिंपरी-चिंचवड! आमदार शंकर जगतापांनी...

May 3, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा...

March 21, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here