• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य ‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; मूलभूत नागरी सुविधांवर भर
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणे

‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; मूलभूत नागरी सुविधांवर भर

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
45

पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ – प्रत्येक प्रभागात मूलभूत नागरी सुविधा दर्जेदार आणि सुरळीतपणे मिळणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. योग्य दाबाने पाणीपुरवठा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त रस्ते तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिका शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करणे, हॉकर्स झोनचे योग्य नियोजन करणे आणि ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन केले जात आहे. आज नेहरूनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस विधी समिती सभापती सुजाता बोराटे, माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्य तुषार सहाणे, योगेश लांडगे, निखिल बो-हाडे, नगरसदस्या सारिका मासुळकर, सारिका बोऱ्हाडे, नम्रता लोंढे, अश्विनी वाबळे, रेखा देवकर, उपआयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, शहरी दळणवळण, जलनिस्सारण या विभागांचे कार्यकारी अभियंते आणि इतर संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना महापौर रवि लांडगे यांनी शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत अधिक काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांना सुरळीत व योग्य दाबाने पाणीपुरवठा होणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी संबंधित विभागांनी नियमित तपासणी करावी तसेच या उपाययोजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना पाण्याचा पुरवठा ठराविक वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मिळावा यासाठी पाण्याच्या वेळापत्रकाबाबतही योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय, महापौर रवि लांडगे यांनी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यावर भर दिला. पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील रस्त्यांवर ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो त्या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देत अशा ठिकाणी सौंदर्यीकरण केल्यास नागरिक कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक प्रभागातून कचऱ्याची ठिकाणे पूर्णपणे हटवून शहर अधिक स्वच्छ व सुबक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

याशिवाय प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करावी, असे त्यांनी सांगितले. शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे ज्या ठिकाणी अतिक्रमणामुळे रहदारीस किंवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे, त्या ठिकाणांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय शहरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर भर देण्याचेही महापौरांनी सांगितले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड अत्यंत महत्त्वाची असल्याने महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.

हॉकर्स झोनच्या नियोजनाबाबतही महापौरांनी महत्त्वपूर्ण सूचना देत प्रत्येक प्रभागात नगरसदस्यांच्या सहकार्याने योग्य जागा निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यामुळे फेरीवाल्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन होऊन शहरातील वाहतूक आणि पादचारी हालचाली अधिक सुलभ होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांच्या समन्वयातून प्रभागातील स्थानिक समस्या ओळखून त्या सोडविण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.

याव्यतिरिक्त, राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा” उपक्रमात शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महापौरांनी केले. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकास यांसंदर्भातील विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून पिंपरी चिंचवड शहराचा मान उंचावण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी विविध विभागांअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच नगरसदस्यांनीही प्रभागात आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि समस्या महापौर लांडगे यांच्यासमोर मांडल्या.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोठा निर्णय
next post
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा

You may also like

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

महाराष्ट्रात ३१ मार्च पासून पावसाचा धडाका; पुण्यासह राज्यभरात...

March 30, 2025

माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो – डॉ. मोहन...

December 18, 2024

महानगरपालिका निवडणूक २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर,...

December 19, 2025

“TDR-FSI चा वापर करून PCMC ने केली ऐतिहासिक...

April 11, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

December 22, 2024

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका

March 21, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 973 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 766 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 760 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 730 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा –...

July 12, 2025

पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा,...

February 17, 2025

“थोर समाजसुधारक संत रविदास महाराज यांना...

February 12, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here