• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजन
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजन

by gauravsalunkhe00@gmail.com February 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
78

१७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या २५० हून अधिक कलाकार उंट,घोडे यांसह भव्य महानाट्याचे सादरीकरण…

पिंपरी,दि.१२ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या विचारांचे, पराक्रमाचे आणि सुशासनाच्या तत्त्वांचे स्मरण करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पर्वाअंतर्गत निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मा. राष्ट्रपती महोदय यांच्या समोर सादर झालेल्या या भव्य महानाट्यप्रयोगामध्ये सुमारे २५० हून अधिक कलाकारांचा सहभाग असून घोडे,उंट तसेच आकर्षक नेपथ्य,नेत्रदीपक अतिषबाजी, प्रकाशयोजना व ध्वनीसंयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात येणार आहेत.महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महानाट्याचा शुभारंभ होणार आहे.

‘शिवगर्जना’ या महानाट्यात शिवाजी महाराज यांच्या जन्माआधीचा काल, छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट (भक्ती शक्ती भेट), तोरणा विजय,स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, शेतकऱ्यांसाठीचे आज्ञापत्र, प्रतापगड मोहीम, पन्हाळगड वेढा आणि सुटका, स्वराज्य आरमार उभारणीचा प्रसंग, पुरंदरचा तह, आग्रा भेट, नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा जिंकण्याचा प्रसंग आणि नेत्र सुखद करणारा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे ऐतिहासिक प्रसंग सजीव स्वरूपात सादर केले जाणार आहेत. इतिहासाची भव्यता आणि राष्ट्राभिमान जागविणारा हा नाट्यप्रयोग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी,सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, शिवप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कर्तृत्व हे प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून शिवरायांचे जीवनकार्य आणि स्वराज्याचा संदेश शहरवासियांपर्यंत पोहोचविणे हा हेतू असून ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा लाभ नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून घ्यावा आणि शिवरायांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन
next post
एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेची वीजवाहिनी टाकणार – आमदार शंकर जगताप

You may also like

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग...

March 17, 2026

“संघाचा प्रचारक ते भटक्यांचा कैवारी – गिरीश प्रभुणेंचा...

June 26, 2025

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ –...

July 12, 2025

पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६...

February 21, 2026

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

पिंपरी-चिंचवडसह श्रीक्षेत्र आळंदीतील प्रस्तावित प्रकल्पांना निधीची मागणी

March 14, 2026

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक...

April 7, 2026

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४००...

February 9, 2026

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक...

January 8, 2026

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल...

April 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here