• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी चिंचवडराजकारण

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by gauravsalunkhe00@gmail.com January 1, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
54

पिंपरी, दि. 1 जानेवारी (प्रतिनिधी):

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास इतिहासात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे योगदान अढळ असून त्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पिंपळेगुरव येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ ‘शक्तीस्थळा’च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आपोआप होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, उभारलेल्या योजना आणि सामान्य माणसाच्या जीवनात घडवलेला बदल आजही दिसून येतो. कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारे हे शक्तीस्थळ आगामी काळात नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आधुनिकतेकडे नेण्याचे स्वप्न पाहिले. राज्य सरकार आणि महापालिकेतील समन्वय साधत त्यांनी विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात उतरवले. 24×7 पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती यांसारख्या योजनांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार शंकर जगताप यांनी आपल्या भाषणातून लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत भावनिक आठवणींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लक्ष्मणभाऊंनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.” त्यांनी लक्ष्मणभाऊंच्या संघर्षमय राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्व उभे केले. नगरसेवक म्हणून सुरुवात करून चार वेळा आमदार म्हणून त्यांनी शहराच्या विकासाला गती दिली.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे वारकरी संप्रदायाशी असलेले नाते, मातीशी जोडलेली नाळ आणि सामान्य माणसांप्रती असलेली आपुलकी यामुळेच ते जनतेचे नेते ठरले. त्यांच्या नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवडला ‘मिनी महाराष्ट्र’ अशी ओळख मिळाली. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी शहराला पुढे नेण्याचा ध्यास घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, लक्ष्मणभाऊंच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आज या शक्तीस्थळाच्या माध्यमातून अधिक बळकट झाला आहे. हे शक्तीस्थळ कायम प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कार्यकर्ते भावूक झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
रहाटणी–पिंपळे सौदागरमध्ये भाजपा सक्षम पॅनेल मैदानात; शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात ‘मिशन PCMC’चा निर्धार
next post
महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38 उमेदवारांची माघार, थेट लढती ठरल्या

You may also like

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा भूमिपूजन सोहळा...

February 24, 2025

संभाजीनगरात सिद्धिविनायक मंदिरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

January 15, 2026

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची...

April 15, 2026

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

पिंपरी-चिंचवडचं नवं नाव “जिजाऊ नगर” व्हावं – आमदार...

July 12, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस” – रस्त्यावर...

March 8, 2025

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण होणार? आमदार...

April 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

तीन वर्षांपासून आर्थिक मदत ठप्प, गरजू...

March 18, 2025

पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध!

February 2, 2026

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये...

March 4, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here