• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश — डॉ. विजय तनपुरे
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश — डॉ. विजय तनपुरे

by gauravsalunkhe00@gmail.com February 21, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
73

पिंपरी, दि. २१ फेब्रुवारी २०२६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक मोहिमेत उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे दर्शन घडते. शिवचरित्र संकटे दूर करत नाही, परंतु संकटांना कसे सामोरे जायचे हे शिकवते, असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या अंतर्गत चिंचवड येथील संभाजीनगर येथे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचे ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, नगरसदस्य कुशाग्र कदम यांच्यासह महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे, सहखजिनदार मंगेश गुंजाळ आदी उपस्थित होते. साई किरण मित्र मंडळाचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

डॉ. तनपुरे यांनी आपल्या व्याख्यानात वेळेचे महत्त्व विविध उदाहरणांद्वारे अधोरेखित केले. एका वर्षाचे, महिन्याचे, आठवड्याचे, दिवसाचे, तासाचे, मिनिटाचे आणि अगदी एका सेकंदाचेही जीवनातील मूल्य किती मोठे असते, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांतून स्पष्ट केले. वेळेचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर केल्यास यश निश्चित मिळते, तसेच जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा गुरू असणे आवश्यक असून तोच आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देतो,माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला अधिक महत्त्व आहे,असे सांगत त्यांनी प्रत्येक कार्याची सुरुवात धाडसाने करावी व कमतरतांकडे न पाहता कृतीवर भर द्यावा. तसेच आई-वडिलांना कधीही विसरू नका, असेही सांगितले.

व्याख्यानाचा समारोप प्रेरणादायी पोवाड्याने झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

You Might Also Like
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
  • आमदार शंकर जगताप यांनी पुणे पदवीधर निवडणुकीत बजावला मतदानाचा हक्क!
  • पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी – कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे
  • कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात;माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!
next post
राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान

You may also like

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित...

December 19, 2025

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार...

October 15, 2026

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश,...

May 15, 2025

“ऑफिस पॉलिटिक्सचा खेळ संपला! या १० स्मार्ट ट्रिक्स...

March 25, 2025

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवगर्जना’चा जल्लोष; पिंपरी...

February 18, 2026

“प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे...

January 5, 2026

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार...

January 28, 2026

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 821 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (561)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (178)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (47)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मोरवाडीत बदलाची लाट! प्रा. दत्तात्रय भालेराव...

December 24, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा...

February 17, 2026

हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड...

November 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here