• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवडआरोग्यराजकारण

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
59

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील विविध विभागांचा महापौरांकडून आढावा; स्वच्छता, अतिक्रमण, पाणीपुरवठा आणि नालेसफाईवर भर

पिंपरी, दि. १० मार्च २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असून, नगरसदस्य तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा प्राधान्याने व वेळेत निपटारा करावा, अशी स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिली. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी, कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण, अतिक्रमणांवर कारवाई करताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसह आवश्यक पायाभूत कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी निगडी येथील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस नगरसदस्य कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, प्रविण भालेकर, यश साने, निलेश नेवाळे, बापू घोलप तसेच नगरसदस्या संगीता ताम्हाणे, योगिता नागरगोजे, शितल वर्णेकर, रिटा सानप, शिवानी नरळे, सोनम मोरे, अर्चना करांडे उपस्थित होते. याशिवाय क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, उपआयुक्त संदीप खोत, प्रदीप ठेंगल, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंते हरविंदरसिंह बन्सल, विजयसिंह भोसले, दमयंती पवार, राजेंद्र जावळे तसेच आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते व इतर पायाभूत सुविधा, उद्याने तसेच नागरी सुविधांबाबत विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की, शहरातील स्वच्छता, अतिक्रमण नियंत्रण, पाणीपुरवठा, उद्यान व्यवस्थापन आणि पशुवैद्यकीय सेवा या सर्व विभागांनी अधिक समन्वयाने आणि वेळेत काम करणे आवश्यक आहे. प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देण्यात यावे. ज्या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात त्या ठिकाणी सुशोभीकरण करून तेथील परिस्थितीत बदल घडवावा. तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करताना त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करावीत, उघड्या गटारे व नाल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसवाव्यात, तसेच शहरातील विविध भागातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक मशिनरींची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नगरसदस्य आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा विहीत वेळेत निपटारा करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय क्षेत्रीय कार्यालयनिहाय श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी नगरसदस्यांसोबत संभाव्य जागांची पाहणी करण्यास सांगण्यात आले. या सर्व कामांचा पुढील तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

दरम्यान, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कार्यालयीन संरचना, अतिक्रमण कारवाईचा अहवाल, पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, प्रलंबित तक्रारी तसेच उत्पन्न व जमा रकमेचा तपशील याबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी नगरसदस्यांनीही त्यांच्या प्रभागातील समस्या व आवश्यक सुविधांबाबत महापौरांसमोर मांडणी केली.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू;
next post
निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर रवि लांडगे यांची भेट

You may also like

“पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवूनच कर्तव्य पालन : माजी...

October 13, 2025

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे...

April 17, 2025

शहरातील प्रत्येक घराचे मोफत ”ड्रोन मॅपिंग”- महसूलमंत्री चंद्रशेखर...

January 7, 2026

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस” – रस्त्यावर...

March 8, 2025

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड...

December 31, 2025

“विजयाचा शंखनाद… पिंपरीत भाजपचाच कौल!”

January 7, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

February 21, 2026

पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील...

January 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी विशेष...

March 4, 2025

🔴 जनसंवाद दौऱ्यातून विश्वासाचा सेतू; विजयनगर-काळेवाडीत...

December 24, 2025

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here