• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू;
पिंपरी चिंचवडपुणे

शहरातील मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महिला ‘एचपीव्ही लसीकरण मोहीम’ सुरू;

by gauravsalunkhe00@gmail.com March 10, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
59

१४ वर्षांच्या मुलींसाठी सर्व पिं. चिं महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण

पिंपरी, दि. ९ मार्च २०२६: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नवीन सांगवी रुग्णालयात सदर मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये २४ लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

महापौर रवी लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षांखालील मुलींसाठी एचपीव्ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर मोहीम ही पुढील ३ महिने चालणार आहे.

HPV ही लस सुरक्षित, प्रमाणित आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी असल्याने पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

एचपीव्ही लसीकरणासाठी पात्र मुलींचे वयोगट

भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षांच्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे पण १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. जगभरात एचपीव्ही लसीचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे, सध्या या वयोगटावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जेणेकरून १५ वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींना वेळेत संरक्षण मिळू शकेल.

लसीकरणासाठी अपात्र परिस्थिती

खालील परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही किंवा पुढे ढकलले जाईल,

* १४ वर्षांच्या लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली
* पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास
* लस किंवा तिच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र ऍलर्जीचा इतिहास असल्यास
* मध्यम ते गंभीर आजार असल्यास – पूर्णपणे बरे झाल्यानंतरच लसीकरण करावे.

मनपा रुग्णालयांमध्ये विनामूल्य एचपीव्ही लस दिली जाणार

सर्व मनपा रुग्णालयामध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ पर्यंत मोफत लसीकरण सत्र सुरु राहतील. नागरिकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे संचलित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी; तालेरा रुग्णालय, चिंचवड; नवीन भोसरी रुग्णालय, भोसरी; इंदिरा गांधी प्रसूती गृह ,सांगवी रुग्णालय, सांगवी; नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव; जिजामाता रुग्णालय, पिंपरी तसेच कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, यमुनानगर येथे संपर्क साधून मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा. तसेच लस घ्यायला येताना आधार, शाळेचे ओळखपत्र ( I card ) तत्सम ओळख पत्र घेऊन आणि भरपेट नाश्ता करून पालकांनी मुलींना घेऊन यावे , असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे

“महिलांच्या आरोग्याचे संरक्षण ही महापालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील १४ वर्षांच्या मुलींसाठी ही लस मोफत उपलब्ध करून देत आहे. पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून या आरोग्य उपक्रमाला प्रतिसाद द्यावा.” – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका.

“महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एचपीव्ही संक्रमण हे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण असून, योग्य वयात दिलेली एचपीव्ही लस हा त्याविरुद्धचा प्रभावी उपाय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी ही मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे.”

-श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

“एचपीव्ही व्हायरस हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. योग्य वयात म्हणजे १५ वर्षांपूर्वी दिलेली एचपीव्ही लस मुलींना दीर्घकालीन संरक्षण देते. त्यामुळे पालकांनी १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.”

-डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न पाळणाऱ्या RMC प्लांटवर कारवाईचा इशारा
next post
नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

You may also like

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी...

February 21, 2025

“पिंपरी चिंचवड: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे शहर झाले...

March 7, 2025

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक...

April 17, 2025

पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीएमएल पास द्या –...

June 26, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश...

April 11, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : मतदान...

December 20, 2025

“पावसाळ्यात साथींचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज – ३५०...

June 14, 2025

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप...

December 10, 2025

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे

January 9, 2026

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“युवोत्सव २०२५: पुण्यातील सर्वात मोठ्या क्रीडा...

March 2, 2025

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही...

February 9, 2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त...

February 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here