• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती
पिंपरी चिंचवडआरोग्यपुणे

ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती

by gauravsalunkhe00@gmail.com March 22, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
44

वसुंधरापूरक उपक्रमांतून शहर हरित व शाश्वत करण्याकडे महत्त्वाचे पाऊल

पिंपरी, दि. २२ मार्च २०२६: पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभावीपणे काम करत असून, आरोग्य विभागाच्या माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम शहरात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.

या उपक्रमामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वसुंधरापूरक उपक्रमांची चळवळ निर्माण झाली असून, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २४ येथील रॉयल कॅसल सोसायटीने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आदर्श निर्माण केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल तसेच उप आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शहरभर प्रभावीपणे राबविला जात आहे.

रॉयल कॅसल सोसायटीमध्ये वसुंधरा संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत सोसायटीचे अध्यक्ष संदिपकुमार शिंदे तसेच विकास जाधव, शरद रिंके, पल्लवी निंबाळकर आणि श्रीधर रसाळ यांचे विशेष योगदान आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन व कंपोस्टिंग प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर केले जात आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे पावसाच्या पाण्याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केला जातो. ग्रे वॉटर प्रकल्पामुळे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचतीस हातभार लागतो.

याशिवाय, सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचे सर्वसमावेशक पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या सोसायट्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून ‘५-स्टार सोसायटी’ म्हणून विशेष मानांकन दिले जाते. रॉयल कॅसल सोसायटीही या मानांकनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येते.

महापालिकेकडून माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत ‘ग्रीन सोसायटी’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलती दिल्या जात असून, एकापेक्षा अधिक प्रकल्प प्रभावीपणे राबविणाऱ्यांना १० ते १५ टक्क्यांपर्यंत करसवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढत असून, शहर हरित बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

“ग” क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य निरीक्षक स्नेहल सुकटे, आरोग्य सहाय्यक प्रशांत गोठे, प्रदीप सोनवणे यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांनी सोसायटीच्या उपक्रमांचे कौतुक करत, महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली अशा उपक्रमांना अधिक चालना मिळत असल्याचे सांगितले. तसेच, नागरिकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू असून, अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे शहराच्या शाश्वत विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिका शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असून ग्रीन सोसायटी या उपक्रमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. यामुळे स्वच्छ आणि शाश्वत शहर उभारणीस गती मिळत आहे. शहरातील इतर सोसायट्यांनीही या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.

-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कचरा व्यवस्थापन, पाणी पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा वापर या बाबींची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे शहरात वसुंधरापूरक बदल घडत असून, भविष्यातील पिढ्यांसाठी हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा दणका
next post
पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात साजरा

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या दिरंगाईवर तीव्र...

April 3, 2025

पिंपरीतील सोसायट्यांचा कौल राष्ट्रवादीकडे; संदीप वाघेरे पॅनेलला मोठा...

January 5, 2026

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

May 7, 2025

पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी

March 7, 2026

“शासनाची ऐतिहासिक मंजुरी: आमदार निधीतून गृहनिर्माण सोसायट्यांना पायाभूत...

March 6, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा! 31 मार्चला...

March 24, 2025

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

February 24, 2026

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा उपमुख्यमंत्री अजित...

January 7, 2026

वाकड–मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला वेग — आमदार...

October 8, 2025

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

चिंचवडकरांसाठी बिग न्यूज! २० लाख लिटर...

March 8, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशासन...

December 19, 2025

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here