• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’
पिंपरी चिंचवडशैक्षणिक

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

by gauravsalunkhe00@gmail.com March 25, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
43

– सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रश्न सुटला
– महापालिका प्रशासनाकडून वर्ग खोल्या केल्या उपलब्ध

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर सुटला असून, तब्बल ४७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही समाविष्ट गावांतील पहिली ‘सीबीएसई’ आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.

या शाळेसाठी २०१७ पासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, २०२० ते २०२३ या कालावधीत वर्गखोल्यांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देता आला नव्हता. सध्या सुमारे १२५० विद्यार्थी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे प्रवेशापासून वंचित होते. ज्या ठिकाणी एका वर्गात ४० मुले आणि ४० मुली असा प्रवेश दिला जातो, त्या ठिकाणी वर्गखोल्या नसल्यामुळे केवळ २०-२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा लागत होता.

या गंभीर समस्येकडे भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महापालिका भूमि जिंदगी विभागाकडून शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या शिक्षण विभागाला हस्तांतरित केल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी एका शैक्षणिक संकूलाचे काम सुरू आहे. त्यामधील एका भागात ही शाळा सुरू होईल. त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

मोशीतील श्री नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या या शाळेत सीनियर केजी ते इयत्ता नववीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. नवीन वर्गखोल्या उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाल्या असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे मोशी परिसरातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.

“गेल्या काही वर्षांपासून वर्गखोल्यांच्या अभावामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. प्रवेश मिळूनही योग्य सुविधा नसल्याने सतत चिंता वाटत होती. आता महापालिका प्रशासनाने वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या मुलांना सुरक्षित आणि योग्य वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. यामुळे पालक म्हणून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.”
– रामेश्वर गालट, पालक.

“मोशी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच आमची प्राथमिकता आहे. सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमधील वर्गखोल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पुढील काळातही परिसरातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पीसीयू येथे क्रीडारंभ २०२६ महोत्सवाचा जल्लोष
next post
नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी ३२७ पैकी १७४ विद्यार्थी पात्र

You may also like

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत...

February 9, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा अधिक बालकांना...

March 5, 2025

पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’

February 28, 2026

“भोसरीत रस्त्यांचा विकास वेगात! आमदार महेश लांडगे यांच्या...

February 22, 2025

नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे यांची वायसीएम...

February 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 28 च्या संपूर्ण...

January 7, 2026

फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी...

August 27, 2026

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करा – सार्वजनिक शौचालयांची...

April 12, 2026

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा...

April 6, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रभाग क्रमांक १४ मध्ये बदलाची लाट?व्यापारी...

December 24, 2025

“पाणीटंचाईने त्रस्त पिंपरी-चिंचवड! आमदार शंकर जगतापांनी...

May 3, 2025

“पिंपरी चिंचवडच्या भूमीतून थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास;...

April 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here