• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा आणि खर्चात बचत करा – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश
पिंपरी चिंचवडराजकारण

महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणा आणि खर्चात बचत करा – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे निर्देश

by gauravsalunkhe00@gmail.com October 30, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
6

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना; बजेट बुकमधील कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड: – महानगरपालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समिती बैठकीत दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. तसेच, महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा व आर्थिक नियोजनाचा सभापती बारणे यांनी सविस्तर आढावा घेतला. महापालिकेची तिजोरी सावरण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी सर्व विभागांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीत उपस्थितीबाबत कडक निर्देश देण्यात आले असून, सर्व संबंधित अधिकारी, विभागप्रमुख, कार्यकारी अधिकारी आणि ह्युमन रिसोर्सेस (HR) यांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाणार आहे. जे अधिकारी अनुपस्थित असतील, त्यांना अनुपस्थित राहण्याचे कारण स्पष्ट करावे लागेल किंवा त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणाला बैठकींना पाठवावे. महानगरपालिकेचे आर्थिक धोरण सुधारण्यासाठी प्रत्येक विभागाने आपला खर्च कसा वाचवता येईल, याबाबतचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक राहील, अशा सूचना देखील त्यांनी केल्या.

महापालिकेच्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यावर भर द्यावा. वापराविना मोकळ्या पडलेल्या मालमत्तामधून मनपाला कसे उत्पन्न मिळेल, याचे नियोजन करावे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व मालमत्तांचे योग्य मॉनिटरिंग करणे ही केवळ एका विशिष्ट विभागाची किंवा व्यक्तीची जबाबदारी नसून, महापालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची ती सामायिक जबाबदारी असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. जर एखादा विभाग सोडून इतर काही निदर्शनास आले, तर संबंधित विभागाला सांगून ती जबाबदारी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी १००% असणे अनिवार्य असून, यामध्ये कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र, काही ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचारी पाणी पुरवठ्याचे काम करतात आणि त्यांची बायोमॅट्रिक हजेरी होत नाही, याबाबत शहानिशा करून योग्य ती सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

बजेट बुकमध्ये समाविष्ट असलेली सर्व कामे आगामी काळात निश्चित वेळेत पूर्ण झाली पाहिजे. ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत किंवा ज्या कामांचे बजेट मंजूर झाले आहे, त्या कामांचा सविस्तर अहवाल १० दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश सभापती बारणे यांनी बैठकीत दिले. तसेच, अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल्स विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत; फाईल किती दिवस प्रलंबित आहे आणि जास्त काळ थांबल्यास त्याची कारणे वरिष्ठांना पत्रद्वारे कळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. फाईल मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. याशिवाय, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची कर्तव्ये आणि कामाची स्थिती याचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.

“महानगरपालिकेचा कारभार करत असताना जनतेच्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे आणि प्रत्येक विभागाने खर्चात बचत करणे काळाची गरज आहे. आमच्या बजेट बुकमध्ये जी कामे मंजूर आहेत, ती वेळेत आणि दर्जेदार झालीच पाहिजेत. जर एखादी फाईल किंवा काम विनाकारण थांबत असेल, तर त्यामागील ठोस कारण आम्हाला लेखी स्वरूपात हवे आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अधिक गतिशीलता द्यावी, हीच स्थायी समितीची मुख्य अपेक्षा आहे.”

– अभिषेक बारणे, सभापती- स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

You Might Also Like
  • भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!
  • खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवडचा वधू वर पालक परिचय मेळावा संपन्न
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे महानगरपालिकेला कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
  • कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा”
  • काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवस; संविधान शिल्प तोडफोड प्रकरणात किरकोळ गुन्हा दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न?- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
  • विश्वविक्रमी सोहळ्याच्या रील स्पर्धेत मयूर अहेर ठरला ‘ब्लॉकब्लास्टर’ विजेता!
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भोसरी-दिघी रस्त्यावरील धोकादायक विद्युत टॉवर तातडीने हटवा!

You may also like

पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित : आमदार...

October 15, 2026

“शासनाची ऐतिहासिक मंजुरी: आमदार निधीतून गृहनिर्माण सोसायट्यांना पायाभूत...

March 6, 2025

🚀 पिंपरी चिंचवड शहराचा सुवर्णकाळ! ‘व्हिजन@५०’ उपक्रमाने शहर...

March 22, 2025

सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा...

December 7, 2025

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

January 17, 2026

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी...

January 8, 2026

रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचा...

January 4, 2026

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

“कर्तव्यपथाचे ३६५ दिवस” : आमदार अमित गोरखे यांच्या...

December 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1.1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 822 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 822 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 792 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (565)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (179)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (30)
  • कला (28)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (565)
  • पुणे (357)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (246)
  • मावळ (1)
  • राजकारण (179)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (47)
  • समाजकारण (48)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

काळभोरनगरमध्ये मा.नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने...

March 17, 2025

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे...

October 31, 2025

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी...

June 17, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here