• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोप
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणेशैक्षणिक

उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद देशपांडे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ समारोप

by gauravsalunkhe00@gmail.com January 15, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
481

पिंपरी, पुणे (दि. १५ जानेवारी २०२५) उद्योग जगतामध्ये यश मिळवण्यासाठी उद्योजकांनी परिवर्तनशील असावे, श्रमाला अर्थपूर्ण संधीमध्ये परावर्तित करून, सर्वोत्तम गुणवत्तेची कास धरून यशस्वी होता येते. खुल्या आर्थिक धोरणात या गिग इकॉनॉमीच्या काळात व्यवसायातील पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून, विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या अनेक व्यक्तींना एकत्रित करून, नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपल्या उत्पादनाचे, सेवेचे वेगळेपण खुल्या बाजारपेठेत सादर करून ग्राहकांना कमी खर्चात सेवा देता आली पाहिजे तोच व्यवसाय व उद्योजक यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ मध्ये समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. आनंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्टार्टअप कंपन्यांना गौरविण्यात आले. यामध्ये विभाग एक : – मिनिमम वायबल प्रॉडक्ट मध्ये प्रथम – एसएनपी इनोवेशन प्रायव्हेट लिमिटेड, द्वितीय – आबराकाडाबरा सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि तृतीय बायोपॅन सायंटिफिक प्रा. लि.; विभाग दोन अर्ली ट्रॅक्शनमध्ये प्रथम – टीजीपी बायोप्लास्टिक प्रा. लि., द्वितीय – हब बायोमास प्रा. लि. आणि तृतीय – बिजअमिका सॉफ्टवेअर प्रा. लि.; विभाग तीन रेव्हेन्यू स्टेज मध्ये प्रथम – कायरस एनर्जीस प्रा. लि., द्वितीय – इव्हेंटबीप आणि तृतीय – सेरेब्रोसपार्क इनोव्हेशन प्रा. लि. यांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली.

यासाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद गोविंदलुरी, कपेल मल्होत्रा, डॉ. सचिन पैठणकर, मिलिंद बाबर, मिलिंद गरूड, राजेश पोखरकर, सनिद पाटील, विनीत लदानिया, सुशील गुजराथी, आणि विजय तळेले यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमात स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी जागतिक गुंतवणुकीचे मार्ग तयार झाले. नवोन्मेष आणि आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्सची महत्त्वपूर्ण भूमिकाही अधोरेखित झाली. या मध्ये एकूण १६ स्टार्टअप्सचे प्रदर्शन करण्यात आले, तर ३० हून अधिक देशांतील १०० हून अधिक उद्योजकांनी उद्योजकता, नवकल्पना आणि जागतिक भागीदारी यावर विचार मांडले.
यावेळी डॉ. आनंद देशपांडे यांनी सांगितले की, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची एक पद्धत असते ती पद्धत बदलणे काही सोपे नसते. त्यासाठी नाविन्यतेचा विचार करायला हवा. तुमचे भांडवल कमी असेल तर तुम्ही अमेरिकेसारख्या देशातील मोठ्या क्षेत्रात स्थान निर्माण करू शकणार नाही. त्यासाठी मोठी तयारी करायला हवी तरच तुम्ही मोठी झेप घेऊ शकता. उत्पादना बरोबरच विपणन व्यवस्था व विक्री पश्चात सेवा देखील प्रत्येक व्यवसायात आवश्यक आहे. लहान मोठ्या स्टार्टअपने स्वतःचे ग्राहक स्वतः शोधले पाहिजे. ग्राहकांच्या नजरेतून आपले उत्पादन आकर्षक बनवा. ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास करून ते करा. तुमचा वैयक्तिक व्यवसाय असेल तर तुमच्या क्षमता पण मर्यादित राहतात. जर तुम्ही एकत्रितपणे काम केले तर तुमच्या क्षमता वाढतात, व्यवसाय वाढतो आणि हेच व्यवसायासाठी फायद्याचे असते. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी रोजगार निर्मिती तयार करू शकत नाही ते तुम्हालाच करावे लागतील. एकट्या महाराष्ट्राने वन ट्रिलियन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. जग वेगाने बदलत आहे, तुम्ही पण बदला. संधी तुमच्या आजूबाजूला आहेत त्या शोधा आणि प्राप्त करा. प्रत्येक व्यवसायिकाला विपणन कौशल्य प्राप्त करता आले पाहिजे. जो विक्री व विक्री पश्चात सेवा देऊ शकतो तो कधीच अपयशी ठरणार नाही, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ. आनंद गोविंदालुरी पीसीईटी आणि सिंगापूर येथील गोविंद होल्डिंग्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
next post
श्री समर्थांच्या पादुका दर्शन निमित्त चिंचवड मध्ये भव्य सामूहिक अग्निहोत्र

You may also like

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद! ई-चलनामुळे संतप्त...

June 30, 2025

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड...

February 21, 2026

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा;...

March 10, 2026

“महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे भव्य कार्यक्रम –...

March 7, 2025

विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपाचा पुन्हा निर्धार

January 5, 2026

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

April 12, 2026

छ. शिवराय हे लोककल्याणकारी राजे – राजेंद्र घावटे

February 19, 2026

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत –...

March 11, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या महापालिका भवनाचे...

March 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 738 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पिंपरी चिंचवडला नवी ओळख! ₹312 कोटींच्या...

March 22, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व...

December 19, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ :...

December 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here