• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी सच्चिदानंद
पिंपरी चिंचवडपुणे

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी सच्चिदानंद

by gauravsalunkhe00@gmail.com December 21, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
63

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धे विरुद्ध उभारलेली राष्ट्रवादी चळवळ – स्वामी सच्चिदानंद

आर्य समाज पिंपरी संस्थेच्या अमृत महोत्सवाची सांगता

पिंपरी, पुणे (दि. २१ डिसेंबर २०२६) महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे तत्कालीन काळात असणाऱ्या अंधश्रद्धे विरुद्ध सुरू केलेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे. त्यांनी देशातील पहिली गोशाळा हरियाणामध्ये सुरू केली. ब्रिटिश सरकारने मीठ करमुक्त करावे यासाठी सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती यांनी सह्यांची मोहीम राबविली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे, असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले.

पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन

करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, यज्ञ हवन, पुरस्कार वितरण, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. समारोपाच्या दिवशी रविवारी, आर्य समाज चळवळीत विशेष योगदान देणारे उत्तम दंडीमे, शकुंतला दंडीमे, लक्ष्मी कलबुर्गी, रमेश वासवानी, वीणा वासवानी, रमेश धर्माणी, मीना धर्माणी, श्रुत चव्हाण, शुभलता चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी “राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य” या विषयावर स्वामी सच्चिदानंद यांनी प्रवचन दिले. पंडित दिनेश आर्य यांनी सुश्राव्य वाणीमध्ये भजन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी डॉ. दि. मा. मोरे, पिंपरी संस्थेचे मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव हरेश तिलोकचंदानी, अतुल आचार्य, दिनेश यादव, उत्तम दंडीमे, जयराम धर्मदासानी, दिगंबर रिद्धीवाडे, संजय वासवानी आदी उपस्थित होते.

स्वामी सच्चिदानंद यांनी सांगितले की, सध्या तरुण पिढीमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिप याचे प्रमाण वाढत आहे, ही पद्धत आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणारी आहे. यामधून जन्मणारी मुले, मुली पुढे बेवारस म्हणून ओळखली जातील हे रोखले पाहिजे. आर्य समाज अंधश्रद्धेचा तिरस्कार आणि महिला व दलितांचा सन्मान, स्वदेशीचा पुरस्कार करणारी एक राष्ट्रवादी चळवळ आहे. विधवा विवाहास प्रोत्साहन महर्षी दयानंद सरस्वती यांनी दिले. बेवारस मुलांसाठी देशातील पहिले अनाथालय फिरोजपुर येथे त्यांनी स्थापन केले. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना आर्य समाजाने केली, तसेच या चळवळीतील बडोद्याचे सयाजीराव
महाराज गायकवाड यांनी बडोदा बँकेची स्थापना केली. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले ८५ टक्के क्रांतिकारी महर्षी दयानंद यांचे मानसपुत्र होते. नीरा आर्या ही आर्य समाज चळवळीतील देशातील पहिली गुप्तहेर महिला होती, तिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रक्षणासाठी ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी असलेला तिचा पती प्रियरंजन दास याला गोळ्या घालून ठार केले होते अशी माहिती स्वामी सच्चिदानंद यांनी दिली.

महोत्सव अंतर्गत शुक्रवारी (दि.१९) पिंपरी कॅम्प येथील संस्थेच्या पटांगणात सकाळी आणि सायंकाळी होम हवन, भजन करण्यात आले. शनिवारी (दि. २०) सायंकाळी, पिंपरी, आचार्य अत्रे नाट्यगृह येथे स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन झाले.
रविवारी (दि. २१)सकाळी संस्थेच्या आवारात २५ कुंडी यज्ञ करण्यात आला. आर्य वीर दल पिंपरी च्या वतीने “हुतात्मा स्वामी श्रद्धानंद बलिदान दिवस” निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता. पिंपरी चिंचवड मनपा चे निवृत्त कर्मचारी अतुल आचार्य यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ६५ वे रक्तदान केले. त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संकलित झालेल्या पिशव्या संजीवनी रक्तपेढीस देण्यात आल्या. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास भेट देण्यात आली. तत्पूर्वी यज्ञ ब्रम्हा पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मयज्ञ व देवयज्ञ करण्यात आले. महाप्रसादाने समारोप करण्यात आला. आर्य समाजाचे कार्य करणारे हेमदेव थापर, साईनाथ पुण्णे, विवेक आर्य, ऋषिपाल आर्य, गणेश देव आर्य यांचा सत्कार करण्यात आला. हर्ष भोंडेले यांनी हनुमान गदा आणि मुद्गल यांचे प्रात्यक्षिक सादर केले.
स्वागत सुरेंद्र करमचंदानी, प्रास्ताविक दिनेश यादव, सूत्र संचालन पल्लवी आमटे, आभार नलिनी देशपांडे यांनी मानले.*

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११, १२, १३ साठी उमेदवारांची मार्गदर्शन बैठक; उद्या घरकुल टाउन हॉल येथे आयोजन
next post
एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ फुलणारच!” 🔥

You may also like

पिंपरीतील सोसायट्यांचा कौल राष्ट्रवादीकडे; संदीप वाघेरे पॅनेलला मोठा...

January 5, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

सुप्रिया चांदगुडे बिनविरोध विजयी;आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली...

January 2, 2026

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय अंतिम...

December 20, 2025

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत...

March 20, 2026

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

“राज ठाकरेंची जबरदस्त एन्ट्री! ९ मार्चला पिंपरी चिंचवड...

March 5, 2025

राष्ट्रपती मुर्मु यांनी दिल्या युवा अभिनेत्री ईशा अगरवालला...

November 30, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश...

December 23, 2025

पिंपरीतील सोसायट्यांचा कौल राष्ट्रवादीकडे; संदीप वाघेरे...

January 5, 2026

हफ्तेखोरी ते टेंडर रिंगपर्यंत आरोपांची मालिकाच;...

January 3, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here