• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका – आमदार महेशदादा लांडगे
पिंपरी चिंचवडराजकारण

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका – आमदार महेशदादा लांडगे

by gauravsalunkhe00@gmail.com January 9, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
28

पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आमदार लांडगे यांचे आवाहन

पिंपरी :- “पिंपरी-चिंचवडकरांनो तुमचा स्वाभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे,” असे ठणकावून सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आठवले) आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित महासभेत ते बोलत होते. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर व जिजामाता रुग्णालय परिसरातील प्रभाग क्रमांक २१ साठी सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिका सुरेश निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.

“स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन करण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार टीका केली. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या सभेत भाजप व स्वतःवर बेछूट आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी, “पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन कोणी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही, लंगोट बांधायला शिकवायचीही गरज नाही,” असे ठणकावून सांगितले.

आमदार लांडगे म्हणाले, “स्थानिकांना सन्मानाची वागणूक त्यांनी कधीच दिली नाही. “बाहेरून येऊन गावागावात वाद लावणाऱ्यांपासून सावध राहा. आज त्यांना १२८ उमेदवारही मिळाले नाहीत, कुठे कुठे काड्या घातल्या याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. आम्ही नुरा कुस्ती खेळणारी मंडळी नाही; जन्मताच लंगोट घालायला शिकलो आहोत. आमच्या लाडक्या बहिणीच त्यांचा कार्यक्रम करतील. देवेंद्रभाऊंच्या लाडक्या बहिणी या आमच्या सोबत आहेत.”

स्थानिक प्रश्नांवर बोलताना आमदार लांडगे म्हणाले, “पिंपरी गावाला काय हवे आहे, हे बारामतीत राहणाऱ्याला कळणार आहे का? पंचवीस वर्षे पालकमंत्रीपद आणि एकहाती सत्ता असूनही शहरासाठी काहीच केले नाही. रेड झोन व डेअरी फार्ममुळे स्थानिक भूमिहीन झाले; तीस वर्षांत हे प्रश्न त्यांना सुटले नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि साडेबारा टक्क्यांचा प्रश्न सोडवला.” शहरात आपर्यंत २९ महापौर झाले, मात्र एकालाही राजकारणात पुढे जाण्याची संधी त्यांनी दिली नाही. आमच्या सुखदुःखात सहभागी होणारा, आमच्यातलाच नेता आम्हाला हवा आहे. विमानातून फिरणारा नाही.” “पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन खोटे आरोप, बदनामी करणे बंद करा. शहरातील माता-भगिनी व विद्यार्थी सुरक्षित वाटले पाहिजेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस आयुक्तालय मंजूर करून घेतले. शहरातील नागरिक भाजपचे काम पाहत आहेत म्हणून मतदान करत आहेत. ही निवडणूक स्थानिक नेतृत्वाला बदनाम करणाऱ्यांना शहरातून हद्दपार करण्याची आहे.” असे शेवटी बोलताना महेश लांडगे म्हणाले.

संजोग वाघेरे राज्याच्या राजकारणात जाणार..

मनातील राग-द्वेष विसरून संजोग वाघेरे पाटील यांच्या पाठीशी उभे रहा. त्यांनी आजपर्यंत अनेक लोक जोडले असून योग्य वेळी निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज संपूर्ण भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत.” लोकसभेत संजोग वाघेरे यांना साडेसहा लाखांहून अधिक मते मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी, “आपला माणूस मोठा होऊ द्या. संजोग भिकू वाघेरे भाजपकडून राज्याच्या राजकारणात जाणार म्हणजे जाणारच,” असा विश्वास व्यक्त केला.

आता हाताला हाताने उत्तर देऊ – संजोग वाघेरे पाटील

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पिंपरी गावचा विकास आजपर्यंत झालेल्या सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. गावात सर्वाधिक उद्याने, सुसज्ज जलतरण तलाव, ग्रामदैवत मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. डेरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला २०१२ साली मंजुरी मिळाली असून भाजप सरकारमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. लवकरच हा पूल लोकांसाठी खुला होणार आहे.” ते पुढे म्हणाले, “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून विरोधकांचा सुफडा साफ होईल. खोट्या आरोपांना बळी पडू नका. टीका झाली तर टीकेने उत्तर देऊ—आता हाताला हाताने उत्तर देऊ.”

या सभेला विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आमदार उमाताई खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, कामगार नेते बाबा कांबळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या महासभेस पिंपरीवासियांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती, महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
next post
गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाची ‘विजयी संकल्प सभा’

You may also like

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड; भाजपचे...

February 20, 2026

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश...

July 12, 2025

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी...

August 20, 2025

मिलेटरी डेअरी फॉर्ममधून पिंपळे गुरव पर्यंत १०० फुटी...

January 7, 2026

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती...

February 22, 2026

“योगिनी महिला बचत गटाचा भव्य शुभारंभ – महिलांसाठी...

February 24, 2025

🚩 प्रभाग क्रमांक 11 निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ;...

December 28, 2025

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

April 15, 2026

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ : टाळगाव चिखली...

October 18, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद...

January 11, 2026

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे...

April 15, 2026

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे...

February 21, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here