• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता
पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
35

पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. बैठकीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन टाकणे व दुरुस्ती, शहरातील रस्त्यांवरील दिव्यांची देखभाल व दुरुस्ती, दफनभूमी व स्मशानभूमींची देखभाल, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प तसेच विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली.

यासोबतच महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरीवरील खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच मनपा हद्दीत मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिला बचत गटांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना कर संकलन विभागाने मंजूर केलेल्या दराने मानधन देण्याच्या उपसूचनेसही मंजुरी देण्यात आली. याशिवाय “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांच्या महिलांमार्फत भरून घेण्याचे काम केलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे यांना जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अदा करण्याच्या उपसूचनेस देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

आजच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुल ते जाधववाडी पंप हाऊसपर्यंत आवश्यकतेनुसार पाईपलाईन टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक (देहू-आळंदी रोड) पर्यंत पाईपलाईन टाकणे, काळेवाडी परिसरातील तसेच प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीतील विद्युत देखभाल व दुरुस्ती, मोशी येथे दफनभूमी विकसित करून अंतर्गत विद्युत कामे करणे या कामांना मंजुरी देण्यात आली.

तसेच यमुनानगर रुग्णालय व निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे जनित्र संच बसविणे, प्रभाग क्र. १ व १२ मधील विविध चौक व कमानींचे सुशोभीकरण करणे, भक्ती-शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा, कार्यालये व दवाखान्यांमधील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करणे या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

याशिवाय ताथवडे येथील जीवननगर पंप हाऊससाठी वीज भार उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीस रक्कम अदा करणे, भामा-आसखेड धरणावरील जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिमी व्यासाची रायझिंग मेन टाकणे तसेच बी.पी.टी. ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिमी व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकताना अडथळा ठरणारे उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करणे, सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्राजवळील २२ केव्ही उपस्कर वाहिनी हटविणे यांसारख्या महत्त्वाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्र. ११ व १३ मधील जुने व धोकादायक पोल बदलणे, चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमी, दापोडी, निगडी, दिघी मुस्लिम व दिघी लिंगायत दफनभूमी येथील काळजीवाहक संस्थांना मुदतवाढ देणे तसेच शहरातील मालमत्ता कर बिले वितरित करणाऱ्या महिला बचत गटांना १० टक्के रक्कम देण्यास येणाऱ्या खर्चासही स्थायी समितीने मंजुरी दिली. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या उपसूचनेसही बैठकीत मान्यता देण्यात आली.

या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर केल्या पाहिजेत – कुलगुरु डॉ. संतोष सोनवणे
next post
क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील क्रीडा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी; विकासकामांचे दिले निर्देश

You may also like

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...

March 17, 2026

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी...

February 21, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित नव उपक्रम, नव संकल्पना सादर...

March 11, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा...

February 17, 2026

“महिला दिन स्पेशल: भव्य फॅशन शोमध्ये आरोग्य जनजागृतीचा...

March 4, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

“पिंपरी चिंचवडच्या भूमीतून थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास; आमदार अण्णा...

April 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

काळभोरनगरमध्ये मा.नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने...

March 17, 2025

बोगस उपसूचनांवर ५२ कोटींची देयके; चौकशी...

April 11, 2026

🗳️ पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणधुमाळी: अजित...

December 27, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here