• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक; शासनाचे ‘लक्ष’ वेधले!
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडच्या वीज प्रश्नावर विधानसभेत आमदार शंकर जगताप आक्रमक; शासनाचे ‘लक्ष’ वेधले!

by gauravsalunkhe00@gmail.com February 28, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
27

आरडीएसएस आणि एनपीएसएएस अंतर्गत पिंपरी चिंचवडच्या विद्युत व्यवस्थेचा दर्जा वाढ करण्याकरता निधी उपलब्ध होणार*

ताथवडे उपकेंद्राच्या प्रलंबित प्रस्तावांवरून सरकारचे कठोर कारवाईचे आदेश; पुण्यात बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेणार

राज्य सरकारकडून पुणे जिल्हयासाठी पुनर्गठित वितरण क्षेत्र योजनेतून ११०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मिळणार गती

मुंबई, 28 फेब्रुवारी : वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक गरजांनुसार पिंपरी-चिंचवड शहराच्या वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) अंतर्गत ११०० कोटी रुपयांच्या आराखड्याला गती देण्यात येणार आहे. दरम्यान, दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ताथवडे उपकेंद्राच्या प्रस्तावावरून आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला असता, विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिले आहे.

आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसरातील वीज समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आमदार जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून २०५१ पर्यंत ती ९३ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. चिंचवड मतदार संघालगत आयटीपार्क जवळ असल्यामुळे रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, ताथवडे आणि पिंपळे सौदागर या भागांत ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पायाभूत सुविधा कमकुवत असल्याने वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारांना नागरिक कंटाळले आहेत. चिंचवड मतदारसंघात महावितरणाचे पिंपरी व भोसरी हे दोन विभाग असून त्यामध्ये हिंजवडी वाकडसारखा आयटी पार्कचा समावेश आहे. शहराच्या वाढत्या विस्तारीकरणात किवळे मामुर्डी, रावेत, पुनावळे, ताथवडे या भागाचा वाढते विस्तारीकरण लक्षात घेता महावितरणच्या विभागाच्या वतीने पुरवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, भूमिगत केबल, ट्रान्सफॉर्मर, फीडर, उच्च दाबाचे उपकेंद्र, पावर ट्रान्सफॉर्मर बसवण्याची गरज आहे. औद्योगिक व्यावसायिक आस्थापना व नागरिकांना अखंड वीज पुरवठा करण्याकरता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी यावेळी आमदार जगताप यांनी केली. विद्युत वाहिन्यांवरील लोड अधिक असल्यामुळे तांत्रिक बिघाड, देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब, वीज पुरवठ्याची सात्यतता,गुणवत्ता यामध्ये त्रुटी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज यांच्यावतीने वारंवार तक्रारी येतात. त्या अनुषंगाने महावितरणाच्‍या भोसरी व पिंपरी विभागातील दर्जावाढ करणे, शहरातील वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्‍याकरिता पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) अंतर्गत 192 कोटीचा प्रस्‍ताव व नागपूर पुणे स्पेशल असिस्टंट स्कीम (एनपीएसएएस ) योजनेअंतर्गत 156 कोटीचा शासनाकडे प्रलंबित असलेल्‍या प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबत आमदार जगताप यांनी शासनाचे लक्ष वेधले.

सभागृहात शासनाचे लक्ष वेधताना आमदार शंकर जगताप म्हणाले, मोशी, चऱ्होली आणि ताथवडे येथे अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्रे उभारणे. वाढत्या ग्राहक संख्येनुसार काळेवाडी, हिंजवडी आणि बिजलीनगर या शाखांचे विभाजन करून नवीन कार्यालये सुरू करणे. भोसरी येथील ‘सेंच्युरी इंका’ उपकेंद्रामध्ये दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील ओव्हरहेड वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्याची मागणी जगताप यांनी केली.

आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या , पिंपरी-चिंचवडच्या वीज आराखड्यासाठी आरडीएसएस (RDSS) आणि इतर योजनांमधून निधीची तरतूद केली आहे. पुणे जिल्हयासाठी ११०० कोटींचा प्रस्ताव असून, त्यातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी ३५० कोटी पिंपरी-चिंचवडसाठी आहेत. ताथवडे उपकेंद्राचा प्रस्ताव महापारेषणकडे दीड वर्षांपासून का प्रलंबित आहे, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधींसोबत लवकरच पुण्यात बैठक घेऊन या सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, आयटी हब आणि वाढत्या नागरीकरणामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वीज यंत्रणेच्या पायाभूत सुविधा कमकुवत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ताथवडे उपकेंद्रासारखे महत्त्वाचे प्रस्ताव मार्गी लागणे गरजेचे आहे . या प्रलंबित प्रस्तावांना तात्काळ मंजुरी मिळवून देणे आणि नवीन शाखा कार्यालयांच्या माध्यमातून ग्राहकांना गतीने सेवा देणे ही आमची प्राथमिकता आहे. या प्रश्नांवर शासन स्तरावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मिळाले असून, लवकरच पुण्यात होणाऱ्या विशेष बैठकीत याचा पाठपुरावा केला जाईल.” राज्य सरकारकडून पुणे जिल्हयासाठी पुनर्गठित वितरण क्षेत्र योजनेतून ११०० कोटी रुपयांच्या आराखड्याला गती मिळणार आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड सह या भागातील औद्योगिक व निवासी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातून वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

— शंकर जगताप

आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडच्या वीज सक्षमीकरणाला ‘‘बुस्टर’’
next post
शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर भर देणार : अभिषेक बारणे

You may also like

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व...

January 7, 2026

“पीसीसीओई टीम मेव्हरिक इंडिया ने जागतिक एरोडिझाईन स्पर्धेत...

April 27, 2025

“छत्रपती शिवाजी महाराज चौक साक्षीदार! संदीप वाघेरे–डब्बू आसवानी...

December 23, 2025

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय...

January 11, 2026

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय...

August 18, 2025

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा...

January 6, 2026

“उद्योजकांसाठी खुशखबर! आता सर्व शासकीय सुविधा एका पोर्टलवर...

April 8, 2025

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी सोहळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या...

August 23, 2025

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी...

August 20, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पुणे-बीडमध्ये ४० किमी/h वेगाने वाऱ्यांसह विजांच्या...

May 5, 2025

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य...

January 1, 2026

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ...

May 7, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here