• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home कला संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक – खासदार श्रीरंग बारणे
कलापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक – खासदार श्रीरंग बारणे

by gauravsalunkhe00@gmail.com January 24, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
112

पिंपरी, पुणे (दि. २४ जानेवारी २०२६) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांनी अभ्यासले पाहिजे. यासाठी पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिवचरित्र अभ्यासक संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध भाषांमधील ५०५ पुस्तकांचा संग्रह शिवचरित्र अभ्यासकांना उपलब्ध करून दिला आहे. संभाजी बारणे यांचा शिवचरित्र संग्रह, तसेच यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड मधील सर्व नगरसेवकांच्या व्हिजिटिंग कार्डचा केलेला संग्रह, पिंपरी चिंचवड शहराची महती सांगणारा त्यांनी संपादित केलेला पिंपरी चिंचवड वैभव हा काव्यसंग्रह आणि शिवकालीन नाण्यांचा संग्रह करण्याचा त्यांचा संकल्प हा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल असे गौरवोउद्गार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले.

खा. श्रीरंग बारणे यांनी नुकतीच संभाजी बारणे यांच्या थेरगाव येथील कार्यालयात भेट दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊसाहेब यांनी बालपणापासून शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, बालवयात महाराजांनी निवडक मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःची करंगळी कापून शिवलिंगावर केलेला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी घेतलेली शपथ, शिवराज्याभिषेक सोहळ्याने नव्या युगाचा प्रारंभ, शिवमुद्रा, स्वराज्याचा विस्तार, आरमाराचे त्यांचे कौशल्य, जलनीती, शौर्यगाथा, दुर्ग विज्ञान, आग्र्याहून सुटका, महाराजांचे गनिमी कावा युद्धतंत्र, शिवकालीन मुस्लिम, सिद्धी व मराठा, धर्मनिरपेक्षता, लष्कर निपुण, त्यांचा वैज्ञानिक, आर्थिक व प्रशासकीय खरा इतिहास व कुशल प्रशासक, आदर्श राज्यकर्ता, राष्ट्रनिर्माता या महाराजांच्या चरित्रातील विविध पैलूंचा सखोल अभ्यास नव्या पिढीने केला पाहिजे. त्यासाठी शिवप्रेमींना, अभ्यासकांना पुण्यातील शासकीय ग्रंथालयात जावे लागते. परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील मराठी सह इंग्रजी, हिंदी, गुजराती, सिंधी, उर्दू, कन्नड अश्या विविध भाषांमधील ५०५ पुस्तकांचा संग्रह थेरगाव येथील त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याचा शिवचरित्र अभ्यासकांनी व युवा पिढीने लाभ घ्यावा असेही खासदार श्रीरंग बारणे यांनी संभाजी बारणे यांचे कौतुक करताना सांगितले.

या संग्रह विषयी अधिक माहिती देताना संभाजी बारणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या जीवनातील आदर्श आहेत. मी बालपणापासून महाराजांची पुस्तके वाचून घडत गेलो. महाविद्यालयीन काळात माझ्याकडे ३०० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह झाला. नंतर प्रवासानिमित्त बाहेर राज्यात गेल्यावर तेथील स्थानिक भाषेतील छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके मी विकत घेतली आणि त्या पुस्तकांचे मराठीत भाषांतर करून त्यांचा अभ्यास केला. अशा पद्धतीने माझ्याकडे आतापर्यंत ५०५ पुस्तकांचा संग्रह झाला आहे. हा संग्रह माझ्या कार्यालयात असलेल्या ग्रंथालयात मी शिवप्रेमींना, वाचकांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये केशव सिताराम ठाकरे, सेतू माधवराव पगडी, न. चि. केळकर, चिंतामण ढेरे, अरुण गोखले, प्रणव गोखले यांच्यासह ना. स. इनामदार, गोविंद पानसरे, शशिकांत पित्रे, श्रीपाल सबनीस, श्रीमंत कोकाटे, हरदास बाळशास्त्री, ब. मो. पुरंदरे, य. दि. फडके, प्र. के. घाणेकर, मंगेश इंगवले, राजाभाऊ इंदलकर, वामन गोपाळ उर्ध्वरेषे, सौरभ कर्डे, वसंत कानेटकर, नरहर कुरुंदकर, अ. रा. कुलकर्णी, पुरुषोत्तम खेडेकर, गणेश हरी खरे, निळकंठ खाडीलकर, गोपाळ चांदोरकर, लहू कचरू गायकवाड, फुलवंताबाई झोडगे, गिरीश टकले, एस. एन. तांबोळी, महेश तेंडुलकर, गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई, दत्ताजी नलावडे, जयसिंगराव पवार, डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार, इस्माईल पठाण, मनोहर यशवंत, वालचंद नामचंद शहा, राजा लिमये, सुहास बहुळकर, प्रभाकर बागुल, निनाद बेडेकर, राम शास्त्री भागवत, ना. धो. महानोर, मा. गो. माळी, शामसुंदर मुळे, गजानन मेहेंदळे, शिरीष मोरे, शेख अहमद, विश्वनाथ शिंदे, वि. स. वाळिंबे तसेच महाराष्ट्र शासनाने शिवराज प्रशस्ती म्हणून प्रकाशित केलेले पुस्तक आदी मराठी लेखकांसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, सिंधी, उर्दू, कन्नड या भाषेतील शिवचरित्र पुस्तकांचा संग्रह आहे.

संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी- ज्ञानेश्वर जगताप
next post
शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

You may also like

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी २०२६ रोजी...

January 8, 2026

पिंपरी-चिंचवडला 54 पदांना मंजुरी: न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होणार...

December 9, 2025

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38 उमेदवारांची माघार,...

January 2, 2026

“शब्दांना कृतीची जोड! आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन...

June 3, 2025

“आज गुलकंद सिनेमा टीम चिंचवडमध्ये; प्रसाद ओक, सई...

April 28, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत जाहीर सभा

January 8, 2026

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा;...

March 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मानव कांबळे यांची अंनिस पुणे जिल्हाध्यक्षपदी...

March 20, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा...

March 21, 2026

एनईपी २०२५ मुळे लाखो नोकर्‍या उपलब्ध...

April 1, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here