• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

by gauravsalunkhe00@gmail.com January 24, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
37

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या नगरसेवकांची आज (शनिवारी) बैठक पार पडली. यात सर्व नगरसेवकांनी विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडण्यासाठी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची पक्षाने नियुक्ती केली होती. त्यानुसार खांडभोर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक निलेश बारणे, निलेश तरस, विश्वजित बारणे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात युवा संघटन बळकट केल्यानंतर विश्वजीत बारणे यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी हाती घेतली. पश्चिम महाराष्ट्रात संघटना बांधणी मजबूत केली आहे. संघटनेतील कामकाजाच्या अनुभवानंतर विश्वजीत यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. प्रभाग २४ मधून त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या माजी उपमहापौर झामाबाई बारणे यांचे पुत्र माजी नगरसेवक राहिलेल्या भाजपच्या सिद्धेश्वर बारणे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. विश्वजीत यांनी आपल्या नगरसेवकपदाच्या पहिल्या इंनिगला सुरुवात केली आहे. त्यांच्या रूपाने अभ्यासू, तरुण, शहरातील युवा पिढीच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व महापालिका सभागृहात आले आहे. विश्वजीत बारणे यांच्यावर विश्वास टाकून सर्व नगरसेवकांनी गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.

याबाबत विश्वजीत बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या सर्वांचा विश्वास पात्र ठरवेल. सभागृहात शिवसेनेचा आवाज दिसेल. शहराच्या विकासाच्या निर्णयाला शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा राहील. मात्र, चुकीच्या कामाला तेवढ्याच आक्रमकपणे विरोध केला जाईल.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
संभाजी बारणे यांच्याकडील शिवचरित्र संग्रह युवा पिढीला मार्गदर्शक – खासदार श्रीरंग बारणे
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

You may also like

“ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार –...

June 3, 2025

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

युवा सक्षम तर देश सक्षम! टेडेक्स पीसीसीओईआरमध्ये आमदार...

February 26, 2025

शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे शासकीय अधिकारी व...

January 7, 2026

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग...

March 17, 2026

भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा...

April 27, 2026

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री...

February 6, 2026

आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत ठसठशीत कामगिरी; पत्रकारांसाठी...

July 21, 2025

“नमामी इंद्रायणी योजनेत मोठा बदल: पर्यावरण प्रेमींना यश,...

May 15, 2025

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा....

February 25, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत नोंदणी करण्यासाठी पीसीसीओईमध्ये...

February 10, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये दारु दुकानदारांचा खेळ खल्लास! 4...

April 1, 2025

भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ...

January 16, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here